शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दसऱ्याच्या शुभेच्छा पोहोचल्या कोजागरीला

By admin | Updated: October 16, 2016 02:17 IST

फुलले हास्य : इंटरनेट सुरू; धडकले मेसेजेस

नाशिक : तळेगाव प्रकरणामुळे तब्बल पाच दिवसानंतर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा शनिवारी (दि. १५) दुपारी सुरू झाल्याने नाशिककरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; मात्र काही मिनिटातच हजारोंच्या संख्येने मेसेजेस धडकल्याने अनेकांचे मोबाइल हॅँग झाले, तर दसऱ्याच्या शुभेच्छा थेट कोजागरीलाच मिळाल्याने अनेकजण अवाक्ही झाले. तळेगाव प्र्रकरणाचा सोशल मीडियावर वाढता उद्रेक लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने १० आॅक्टोबर रोजी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागतही केले. दरम्यान, जिल्ह्यात सामाजिक शांतता निर्माण होऊन तणाव पूर्णत: निवळल्याने प्रशासनाने शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास इंटरनेट सेवा पूर्ववत केली. यामुळे नाशिककरांच्या चेहऱ्यावर अक्षरश: हास्य फुलले. अनेकांनी तर हा आनंद ग्रुपवर मेसेजेस पाठवून साजरा केला. ‘दहावी पास झाल्यावर जितका आनंद नाही झाला; तितका आज इंटरनेट सुरू केल्यावर झाला- एक नाशिककर’ अशा आशयाचे मेसेजेस वेगवेगळ्या ग्रुपवर दिवसभर झळकत होते. तर दसऱ्याचे मेसेज थेट कोजागरीला मिळत असल्याने अनेकजण अवाक्ही झाले. यावर शक्कल म्हणून काहींनी तर दसरा, कोजागरीसह दिवाळीचेही मेसेजेस शेअर केले. ‘पुन्हा इंटरनेट सेवा बंद केल्यास आजच दिवाळीच्या शुभेच्छा स्वीकाराव्यात’ असे गमतीशीर मेसेजेसही शेअर केले. दरम्यान, इंटरनेट सेवा सुरू केल्यानंतर एकापाठोपाठ हजारोंच्या संख्येने मेसेजेस धडकल्याने अनेकांचे मोबाइल हॅँग झाले. यावर तोडगा म्हणून अनेकांनी थेट व्हॉट्सअ‍ॅपच अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल केला. तर काहीजण तासन्तास केवळ मेसेजेस वाचण्यात दंग झाले होते. दिवसभर सुरू असलेल्या या इंटरनेट नाट्यामुळे जणू काही नाशिककरांची ‘एखादी हरवलेली प्रिय वस्तू परत मिळाल्याच्या आनंद’ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.