शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीच्या काळात जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 15:40 IST

मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी सहा सदस्यीय समिती गठीत केली असून, या समितीने गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेत तळ ठोकला आहे. या समितीला चौकशीत संपुर्ण सहकार्य करून देण्याच्या सुचना यापुर्वीच भुवनेश्वरी यांनी अधिका-यांना दिल्या

ठळक मुद्देभुवनेश्वरी एस. : गैरहजर कर्मचाऱ्यांना हजर होण्याचे आदेशअधिकारी व कर्मचा-यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या कारभाराची समितीमार्फत विभागीय आयुक्तांनी सुरू केलेली चौकशी निष्पक्ष व पारदर्शीपणे व्हावी यासाठी खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांंनीच पुढाकार घेतला असून, चौकशी समितीच्या कामकाजात खंड वा अडचणी निर्माण होवू नयेत यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत शिवाय जे अधिकारी, कर्मचारी रजेवर गेले असतील त्यांना तात्काळ कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी सहा सदस्यीय समिती गठीत केली असून, या समितीने गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेत तळ ठोकला आहे. या समितीला चौकशीत संपुर्ण सहकार्य करून देण्याच्या सुचना यापुर्वीच भुवनेश्वरी यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत. तथापि, या उपरही समितीला चौकशीत कोणतेही अडथळे येवू नयेत म्हणून त्यांनी सर्व खाते प्रमुख, सहाय्यक व कनिष्ठ प्रशासन अधिकार, सहाय्यक लेखाधिकारी यांनी उद्देशून पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, चौकशी समितीने उपस्थित केलेले मुद्दे व पुरविलेले विहीत नमुन्यात व विहीत वेळेत परिपुर्ण माहिती पुरविणे बंधनकारक आहे. त्यामुळे समितीचे कामकाज पुर्ण होईपावेतोच्या कालावधीत कोणतेही अधिकारी व कर्मचारी मुख्यालय सोडणार नाहीत. त्याच बरोबर या कालावधीत कोणत्याही अधिकारी व कर्मचाºयांच्या रजा पुर्व परवनागीशिवाय मंजूर करू नये. यापुर्वी जे संबंधित अधिकारी, कर्मचारी रजेवर आहेत त्यांच्या रजा तात्काळ रद्द करून त्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. चौकशी समितीला आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून देण्यास कोणत्याही प्रकारची टाळाटाळ अथवा दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी व कर्मचा-यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही भुवनेश्वरी एस. यांनी दिला आहे.दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या या पत्राची प्रत तात्काळ सर्व खाते प्रमुखांना रवाना करण्यात आल्या असून, रजेवर जाऊ पाहणारे व रजेवर गेलेल्या कर्मचाºयांना तात्काळ कामावर हजर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. चौकशी समितीचे कामकाज किती दिवस चालेल याचा उलगडा होत नसला तरी, चौकशी समितीला सर्वतोपरि सहकार्य करण्याची भूमिका जिल्हा परिषदेने घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद