शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

महिला पदाधिकाºयांचा दुर्गावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 23:47 IST

नाशिक : शक्ती आणि सक्षमतेचे प्रतीक असलेल्या नवदुर्गांचा नवरात्रोत्सव तोंडावर आलेला असताना नाशिक जिल्हा परिषदेतील अधिकाºयांना महिला पदाधिकाºयांचा दुर्गावतार पाहायला मिळाला. प्र

ठळक मुद्देस्थायीची सभा तहकूब : नियोजनातील दिरंगाई; अधिकाऱ्यांची कानउघाडणी

नाशिक : शक्ती आणि सक्षमतेचे प्रतीक असलेल्या नवदुर्गांचा नवरात्रोत्सव तोंडावर आलेला असताना नाशिक जिल्हा परिषदेतील अधिकाºयांना महिला पदाधिकाºयांचा दुर्गावतार पाहायला मिळाला. प्रशासकीय अधिकाºयांमुळे विकासकामांचे नियोजन रखडले असून, विविध अधिकारी पदाधिकाºयांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाढत्या फाइल पेंडन्सीवर महिला पदाधिकारी उपाध्यक्ष नयना गावित यांच्यासह बांधकाम सभापती मनीषा पवार आणि महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनी अधिकाºयांची चांगलीच कानउघाडणी केली, तर प्रशासनाच्या हलगर्जी कामकाजावर नाराजी व्यक्त करतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी आल्याशिवाय सभा न घेण्याची भूमिका अध्यक्ष शीतल सांगळे यांनी घेत स्थायी समितीची सभा तहकूब केली.जिल्हा परिषद स्थायी समितीची मासिक सभा गुरुवारी (दि.४) अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. मात्र, सभेच्या सुरुवातीस डॉ. भारती पवार यांच्यासह समिती सदस्यांनी निधी नियोजनाचा प्रश्न उपस्थित करीत झालेले नियोजन सादर करण्याची मागणी केली. परंतु, अधिकाºयांना नियोजन सादर करता आले नाही. त्यामुळे सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सभेला मुख्यकार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या अनुपस्थितीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सहा-सहा महिन्यांपासून फाइलींवर स्वाक्षरी होत नसल्याची सभापती यतिंद्र पगार, सुनीता चारोस्कर, अर्पणा खोसकर यांनी व्यक्त केली, तर उपाध्यक्ष नयना गावित यांनी त्यांच्या वाडीवºहे गटातील पाण्याच्या टाकीची फाइल चक्क दीड वर्षापासून प्रलंबित असल्याचे सांगत प्रशासनाच्या कामकाजातील दिरंगाईचा पाढाच वाचला. मुख्य कार्यकारी अधिकारी सभेला नसतील तर सभेत निर्णय कोण घेणार? असा सवाल उपस्थित करतानाच सप्टेंबरअखेर टंचाई आराखडा सादर करावयाचा असतानाही तो सादर केलेला नाही, त्यामुळे टँकर बंद करण्याची नामुष्की ओढविल्याचे डॉ. भारती पवार यांनी सांगितले.पदाधिकाºयांची सभा न घेण्याची मागणीजिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यूचे थैमान असताना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी साधी आढावा बैठकही घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. सभापती यतिंद्र पगार यांनीही मागील वर्षातील कामांचे कार्यारंभ निघालेले नसल्याचे सभागृहाच्या समोर आणले. त्यावर, सर्वच सदस्य अन् पदाधिकाºयांनी ही सभा न घेण्याची मागणी अध्यक्ष सांगळे यांच्याकडे केल्याने त्यांनी सभा तहकूब केली.