शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

पाऊस थांबल्याने गंगापूर धरणाच्या  विसर्गात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:12 IST

रविवारी अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी सकाळनंतर दिवसभर उघडीप दिल्याने त्याचबरोबर धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गंगापूर धरणाच्या विसर्गात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे गोदाकाठचे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे.

नाशिक : रविवारी अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी सकाळनंतर दिवसभर उघडीप दिल्याने त्याचबरोबर धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गंगापूर धरणाच्या विसर्गात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे गोदाकाठचे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे.गेल्या सोमवारपासून गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग केला जात असून, त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्र्यंबकेश्वर व गंगापूर धरणाच्या क्षेत्रात पाऊस कायम असल्यामुळे धरणात ७७ टक्के जलसाठा झाला आहे. जुलै महिन्यात कितीही पाऊस पडला तरी, गंगापूर धरणाची सुरक्षितता  लक्षात घेता ७५ टक्केच जलसाठा ठेवता येतो, त्यामुळे गेल्या सोमवारी ९३०२ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सलग तीन दिवस करण्यात आला, त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने त्यात कपात करण्यात आली. मात्र शुक्रवारपासून पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्याने विसर्गात वाढ करण्यात आली होती.रविवारी धरणातून ५९३१ क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीला पूर येऊन दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पाणी पोहोचलेत्यामुळे गोदाकाठचे जनजीवन विस्कळीत झाले होते. नदीकाठावरील व्यावसायिकांनी तेथून काढता  पाय घेतला होता. तथापि,  रविवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा  जोर ओसरताच, पाटबंधारे  खात्याने विसर्गात कपात केली. सोमवारी दुपारनंतर २४९६  क्यूसेक पाणी सोडण्यात आले, त्यामुळे पूर ओसरण्यास मदत झाली आहे. सायंकाळी मारुतीच्या गुढग्यापर्यंतच पाणी होते.  त्यामुळे रामकुंडाच्या बाजूच्या व्यावसायिकांनी आपले व्यवहार पूर्ववत सुरू ठेवले होते. स्नानाला मुकलेगोदावरीला पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त गोदावरीत दरवर्षी स्नानासाठी येणाºया भाविकांची गैरसोय झाली. गोदावरीचे पाणी वस्त्रांतरगृहाच्या पायºयांपर्यंत असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस व महापालिकेकडून या भागात भाविकांना जाण्यास मज्जाव करीत होते. त्यामुळे अनेक भाविकांना काठावरच कसेबसे स्नान उरकावे लागले.

टॅग्स :godavariगोदावरी