शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्का लावल्याच्या कारणावरून बसचालकाला बेदम मारहाण

By admin | Updated: July 3, 2014 00:07 IST

धक्का लावल्याच्या कारणावरून बसचालकाला बेदम मारहाण

 

क़ का़ वाघ महाविद्यालयाजवळील प्रकार : वाहतुकीचा खोळंबाकोणार्कनगर : धक्का मारल्याच्या कारणावरून दुचाकीधारकांनी परिवहन महामंडळाच्या बसचालकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी क़ का़ वाघ महाविद्यालयाजवळ घडली़ या घटनेमुळे महामार्गावर सुमारे दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पालघर-शिरपूर (एमएच २०, बीएल २७३७) ही परिवहन महामंडळाची बस नाशिककडे येत होती़ या बसचा दुचाकीला (एमएच १५, डीडब्ल्यू ४७६०) धक्का लागल्याच्या कारणावरून बसचालक दुर्गेश कोळी यांना दुचाकीस्वार व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण करून पळ काढला़ या मारहाणीत बसचालक कोळी हे बेशुद्ध झाले़बसचालक कोळी हे बसमध्येच बेशुद्ध पडल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली़ या घटनेची माहिती वाहतूक पोलीस संजय वाघमारे यांना मिळताच त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून कोळी यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले़ बसचालकाला मारहाण होत असताना महाविद्यालयीन विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीवरील युवकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे़ (वार्ताहर) प्रवासी वेठीसया घटनेनंतर परिवहन महामंडळाकडून बदली चालक न दिल्यामुळे बसमधील प्रवाशांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले़ यानंतर बऱ्याच वेळाने दुसऱ्या खाली जागा असलेल्या बसेसमध्ये प्रवाशांना बसविण्यात आले़  महामंडळातील बसचालक, बसवाहक यांना मारहाण होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ या मारहाणीविरोधात कामगार संघटना एकत्रितपणे आवाज उठवून मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.- प्रमोद भालेकर, सचिव, महाराष्ट्र कामगार संघटना