वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सटाणा ते तळवाडा हा मार्ग पावसात वाहून गेल्याने रहिवाशांचे हाल होत आहे. वटार येथील निम्मे रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. संबंधित अधिकऱ्यांनी सटाणा ते तळवाडा रस्त्याची दुरूस्ती करून छोट्या वाहनांसाठी खुला करून दिला होता. परंतु विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे एसटी बसेस ही सुरू करण्यात आल्या. सदर रस्त्या पावसाच्या पाण्यात पूर्ण खचल्याने रस्त्याला कपार निर्माण झाली आहे. मोठा अपघात होण्याची शकता अवजड वाहन चालकांकडून वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता खचला असून, कोणीही अधिकारी तपासणीसाठी आलेला नाही. स्थानिक लोकांच्या मागणीनुसार रस्त्याच्याएका साइडला वाळूचा भराव टाकून रस्त्याची दुरूस्त करून दिली. शेतकरी याच मार्गाने आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजारात नेतात. त्यांना जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे. थोडाही नजर इकडे तिकडे झाली तरी गाडी खड्ड्यात जाण्याची भीती आहे, असे मत वाहनचालकांनी व्यक्त केले आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्याला तडे पडत असून, एक वाहन निघायला मोठी कसरत करावी लागत आहे. (वार्ताहर)
पावसामुळे खचला रस्ता
By admin | Updated: July 28, 2016 00:29 IST