शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळीतील गुदामावर तहसीलदारांचा छापा रेशनिंगच्या धान्याचा संशय : गुदामातील २०० धान्यांच्या गोण्या सील करून टेम्पो जप्त

By admin | Updated: December 10, 2014 01:50 IST

विल्होळीतील गुदामावर तहसीलदारांचा छापा रेशनिंगच्या धान्याचा संशय : गुदामातील २०० धान्यांच्या गोण्या सील करून टेम्पो जप्त

  नाशिक : विल्होळी शिवारातील देव अ‍ॅग्रो फुडच्या गुदामावर मंगळवारी सायंकाळी तहसीलदार व पोलिसांनी छापा टाकून धान्याच्या सुमारे दोनशे गोण्या व टेम्पो जप्त केला़ हे रेशनिंगचे धान्य असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याचा खुलासा बुधवारी होणार आहे़ दरम्यान, छापा पडताच टेम्पोचालक व त्यातील मजूर हे फरार झाले आहेत़ याबाबत अधिक माहिती अशी की, विल्होळी शिवारातील गट नंबर १४ येथे देव अ‍ॅग्रो फुड नावाचे गुदाम असून, मंगळवारी सायंकाळी या ठिकाणी धान्याचा टेम्पो (एमएच१५, एजी ३६०९) खाली होत होता़ तेथील ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी याबाबत तालुका पोलीस ठाणे, धान्य पुरवठा अधिकारी व तहसीलदारांना माहिती दिली़ त्यानुसार तहसीलदार गणेश राठोड यांनी पोलिसांसमवेत गुदामावर छापा टाकला असता टेम्पोचालक व मजूर यांनी पलायन केले़ दरम्यान, हे गुदाम रोगे नावाच्या इसमाचे असून, ते साबळे नामक व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिल्याचे वृत्त आहे़ या गुदामामध्ये गहू व तांदळाच्या सुमारे दिडशे, तर टेम्पोमध्ये ५० गोण्या होत्या़ गुदामातील सर्व धान्य तहसीलदारांनी जप्त केले असून, गुदाम सील केले आहे़ तसेच धान्याची वाहतूक करणारा टेम्पोही जप्त केला आहे़ दरम्यान, जप्त केलेले धान्य हे रेशनिंगचे आहे की नाही याबाबत बुधवारी खुलासा होणार आहे़