शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भंगार उचलताना पालिकेची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:41 IST

नऊ महिन्यांपूर्वी कारवाई करूनही सातपूर-अंबड लिंकरोडवर पुन्हा वसलेल्या भंगार बाजारविरोधी महापालिकेने गुरुवारी (दि.१२) मोहीम सुरू केली. या मोहिमेत माल जप्त करण्याची प्रक्रिया राबविल्याने भंगार उचलताना महापालिकेची दमछाक झाली.

सिडको/सातपूर : नऊ महिन्यांपूर्वी कारवाई करूनही सातपूर-अंबड लिंकरोडवर पुन्हा वसलेल्या भंगार बाजारविरोधी महापालिकेने गुरुवारी (दि.१२) मोहीम सुरू केली. या मोहिमेत माल जप्त करण्याची प्रक्रिया राबविल्याने भंगार उचलताना महापालिकेची दमछाक झाली. दिवसभरात १६९ ट्रकमाल जप्त करून तो सातपूर क्लब हाउसजवळील मैदानात नेऊन टाकण्यात आला. दरम्यान, मोहिमेप्रसंगी काही व्यावसायिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांपुढे त्यांची मात्रा चालली नाही. शुक्रवारीही सदर मोहीम पुढे सुरूच राहणार आहे.महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये भंगार बाजार विरोधी ऐतिहासिक मोहीम राबविली होती. त्यावेळी सुमारे ७५०हून अधिक व्यावसायिकांच्या अतिक्रमणावर बुलडोझर चालविण्यात आला होता. दरम्यान, भंगार बाजार व्यावसायिकांनी पुन्हा एकदा हळूहळू हातपाय पसरत अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्याने महापालिकेने संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत स्क्रॅप मर्चंट असोसिएशनने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. परंतु, न्यायालयानेही व्यावसायिकांची याचिका फेटाळून लावत त्यांना कायद्याचा गैरवापर केल्याप्रकरणी दहा हजारांचा दंड ठोठावला. तत्पूर्वी, महापालिकेने पोलीस बंदोबस्त प्राप्त होताच गुरुवार (दि.१२) पासून पुन्हा भंगार बाजार हटाव मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार, गुरुवारी सकाळी १० वाजेपासून कारवाईस सुरुवात करण्यात आली. एस्सार पेट्रोल पंपापासून कारवाई सुरू होऊन ती सायंकाळी संजयनगरपर्यंत चालली. महापालिकेने कारवाईसाठी सहा पथके तयार केली होती. त्यात प्रत्येक पथकात तीन जेसीबी, दोन क्रेन, सहा डम्पर यांची व्यवस्था करण्यात आली होती. भंगार बाजार व्यावसायिकांनी उभारलेले तात्पुरते शेड यावेळी हटविण्यात आले. परंतु, बºयाच व्यावसायिकांनी आपल्या जागांवर मोठ्या प्रमाणावर माल आणून ठेवल्याने तो उचलताना महापालिकेच्या पथकाची दमछाक झाली.