शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

नायगाव खोऱ्यात पाण्याअभावी लाल कांद्याचे पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:37 IST

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात विहीरींनी तळ गाठल्याने शेकडो एकर लाल कांद्या बरोबर विविध पिके करपू लागली आहे. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी सध्या बोअरवेलच्या माध्यमातून शेती व्यवसाय टिकविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहे.

ठळक मुद्देशेतकºयांवर दुष्काळात तेरावा महिना अनुभवण्याची वेळ आली आहे.

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात विहीरींनी तळ गाठल्याने शेकडो एकर लाल कांद्या बरोबर विविध पिके करपू लागली आहे. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी सध्या बोअरवेलच्या माध्यमातून शेती व्यवसाय टिकविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहे.नायगाव परिसराबरोबरच तालुक्यातील सर्वच विहिरींनी नोव्हेंबरच्या मध्यावरच तळ गाठला आहे. सध्या पाण्याअभावी दिवसागणिक शेतातील उभे पीक सोडून देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. परिसरात दररोज एक ते दोन एकर क्षेत्रातील पीके पाण्याअभावी सोडले जात असल्याची विदारक परिस्थती बघावयास मिळत आहे.यंदा भरपूर पाऊस पडण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजावर भरोसा ठेऊन शेतकºयांनी खरीपाच्या पेरणी व लागवडीची तयारी केली होती. खरीपाच्या पिकांनी शेत -शिवार हिरवेगार होण्यापर्यंत कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. मात्र सर्वच पीक काढणीला येण्याआधी शेतातच करपून गेली होती. नोव्हेंबर महिण्यातच विहिरींनी तळ गाठला आहे. हजारो रूपये खर्चुनही शेकडो एकर लाल कांद्याबरोबरच विविध पिकेही अपुºया पाण्यामुळे सोडण्याची वेळ आल्याने शेतकºयांवर दुष्काळात तेरावा महिना अनुभवण्याची वेळ आली आहे.आडातच नाही तर......संपूर्ण पावसाळ्यात एकदाही नदी - नाले पावसाच्या पाण्याने वाहीले नसल्याने जमिनीतील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. शेतात लागवड केलेले पिके वाचविण्याची भोळी अशा व येणाºया काळात पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था होईल या दोन्ही कारणाने परिसरात अनेक शेतकरी बोरवेल मशिनच्या सहाय्याने कुपनलीका खोदुन आपले नशीब आजमावत आहे. मात्र अत्यल्प पडलेल्या पावसामुळे जमिनीतच पाणी नसल्याने कुपनलीका खोदण्यासाठी फुटांवर पैसे मोजणारे शेतकरी सध्या खेळत असलेला पाण्याचा जुगार जुगारच ठरत आहे.गव्हाचे उत्पादन घटणारआत्ता पर्यंत पाण्याअभावी खरिपाची पुरती वाताहत झाली आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगाम घेण्याची आशा धाडसाचे ठरणार आहे. त्यामुळे रब्बीतील गव्हाचे क्षेत्र नायगाव परिसरात मोठया प्रमाणात घटणार असल्याने यंदा शेतकºयांवरही धान्य विकत घेण्याची वेळ येणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.कमी पाण्यात जास्तीतजास्त क्षेत्र ओलीताखाली येण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्यामुळे नायगाव परिसरात अनेक शेतकºयांनी ठिबक सिंचनचा वापर करून टोमॅटो, कोबी, मिरची अशी अनेक पिकांची मल्चींग पेपरवर लागवड केली. मात्र आत्ताच विहिरींनी तळ गाठण्यास सुरवात केल्याने महागडा खर्च करून ठिबक सिंचनवर लागवड केलेली पीकही हातची वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.फोटो क्र. : 18२्रल्लस्रँ06, 18२्रल्लस्रँ07 फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील तुकाराम गिते यांच्या शेतातील लाल कांद्याचे पिक पाण्याअभावी करपून गेले आहे. तर दुसºया छायाचित्रात ज्ञानेश्वर दिघोळे यांच्या शेतात ठिबक सिंचनवर लावलेले टोमॅटोचे पीकही करपून गेले.