शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकी एकादशीनिमित्त दर्शनासाठी मंदिरांत गर्दी

By admin | Updated: November 4, 2014 00:42 IST

कार्तिकी एकादशीनिमित्त दर्शनासाठी मंदिरांत गर्दी

 

नाशिक : भाळी बुक्का आणि हरिनामाचा गजर करत भाविकांनी आज कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर, काळाराम मंदिर यांसह शहरातील विविध मंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली होती. वारकऱ्यांमध्ये आषाढीनंतर प्रमुख मान असलेल्या कार्तिकी एकादशीनिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिवसभर चित्र होते़ प्रामुख्याने कॉलेजरोडवरील विठ्ठल मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ सकाळी विठ्ठल- रुक्मिणीच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली़ विविध भजनी मंडळांच्या वतीने भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ कार्तिकी एकादशीनिमित्त राम मंदिरालाही विद्युत रोषणाई करण्यात आली होती़ विठ्ठल मंदिरांसह दिवसभर राम मंदिरांतही दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती़ रात्री राम मंदिरात झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा व भजनाचा भाविकांनी लाभ घेतला़ सुंदरनारायण मंदिर येथेही भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती़ या ठिकाणी सुरू असलेल्या हरिहर भेट महोत्सव व कार्तिकी एकादशीनिमित्त साई भजनावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ यासह गोरेराम लेन विठ्ठल मंदिर, पूर्व दरवाजा विठ्ठल मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर, कृष्ण मंदिर, बालाजी मंदिर अशा विविध मंदिरांमध्येही भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती़ उपनगरांतील काही मंदिरांमध्ये विशेष पूजा, भजन, प्रवचन, कीर्तन व दिंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते़ (प्रतिनिधी)