शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’मुळे ढेकू शिवार झाले जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:48 IST

नाशिक : नांदगाव तालुक्यातील ढेकू गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या क्षेत्र उपचार अणि बंधाऱ्याच्या कामामुळे कमी खर्चात अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे ढेकू गाव जलपरिपूर्ण झाले असून, जलमय झालेल्या ढेकू शिवारात पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनाही जलसंधारणाचे महत्त्व ध्यानी आले आहे.

ठळक मुद्देनांदगाव : क्षमतेत २०५ टीएमसीने वाढ

नाशिक : नांदगाव तालुक्यातील ढेकू गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या क्षेत्र उपचार अणि बंधाऱ्याच्या कामामुळे कमी खर्चात अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे ढेकू गाव जलपरिपूर्ण झाले असून, जलमय झालेल्या ढेकू शिवारात पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनाही जलसंधारणाचे महत्त्व ध्यानी आले आहे.नांदगाव तालुक्यातील ढेकू बुद्रूक आणि ढेकू खुर्द अशा दोन्ही गावांत पाणीटंचाई असल्याने उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. विहिरीची पाणीपातळी जानेवारीनंतर खालवत असल्याने त्यानंतर पिके घेणे कठीण होत असे. परंतु ‘जलयुक्त शिवार’ योजनेत गावाची निवड झाली आणि या गावाचे रूपच पालटले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दोन्ही गावांत विविध यंत्रणांमार्फत २८ कामे पूर्ण करण्यात आली. यावर १९ लाख रु पये खर्च करण्यात आला. गाळ काढण्याच्या कामात लोकसहभागही चांगला मिळाला. एकूण दोनशे हेक्टर क्षेत्रावर कामे घेण्यात आली. ढेकू बुद्रूक गावाची पाण्याची एकूण गरज ३३३ टीसीएम असताना पाणीसाठा २२४ टीसीएम होता. नव्या कामांमुळे २०५ टीसीएम अतिरिक्त पाणीक्षमता निर्माण झाल्याने पाऊस चांगला आल्यास रब्बीच्या पिकांसाठीदेखील पाणी उपलब्ध होणार आहे. ढेकू खुर्द गावात पाण्याची गरज ४२० टीसीएम असताना जलयुक्तच्या कामांमुळे एकूण ४२८ टीसीएम पाणीक्षमता निर्माण झाली आहे. दोन्ही गावांत आॅगस्ट महिन्यातील चांगल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. तयार करण्यात आलेल्या मातीला बांध व गॅबिअन बंधाºयामुळे पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, तर क्षेत्र उपचारामुळे भूजल पातळीतही वाढ झाल्याने विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.नांदगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत माथा ते पायथा कामे झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊन खरिपानंतर शेतकºयांना दुसरे पीकही घेणे शक्य होणार आहे. -विजय पवार, तालुका कृषी अधिकारीकम्पार्टमेंट बंडिंगच्या कामांमुळे शिवारात चांगले पाणी जिरले आहे. त्यामुळे विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पिकांना आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.-प्रदीप सूर्यवंशी, नागरिक