शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

माश्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 17:46 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन येथे सुरू असलेल्या एका पोल्ट्रीमुळे माश्यांचा प्रचंड प्रमाणात उपद्रव वाढल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माश्यांमुळे नागरिकांना घरात बसणे देखील कठीण झाले आहे. नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देवून तसेच पाहणी करून सदर पोल्ट्री फार्म बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे रहिवाशांनी केली आहे.

ठळक मुद्देअस्वली स्टेशन : ग्रामपंचायत, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देवूनही दुर्लक्ष

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन येथे सुरू असलेल्या एका पोल्ट्रीमुळे माश्यांचा प्रचंड प्रमाणात उपद्रव वाढल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माश्यांमुळे नागरिकांना घरात बसणे देखील कठीण झाले आहे. नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देवून तसेच पाहणी करून सदर पोल्ट्री फार्म बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे रहिवाशांनी केली आहे.नांदूरवैद्य हद्दीत असलेल्या या पोल्ट्री फार्ममुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून माश्यांचा उपद्रव वाढला आहे. सदर पोल्ट्रीमुळे या भागातील रहिवाशी पुरते वैतागला आहेत. दिवस - रात्र दरवाजे, खिडक्या बंद ठेवाव्या लागत आहे.याबाबत नांदूरवैद्य ग्रामपंचायतीकडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्व शासनस्तरावर निवेदने देऊन शिवाय या संदर्भात वारंवार कळवून सुध्दा कोणतीही दखल घेत नसल्याची नागरीकांची ओरड आहे.आगामी दहा दिवसात पोल्ट्री फार्मबाबत संबंधित अधिकारी यांनी योग्य निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरणे भाग पडेल असे निवेदन देणाºया नामदेव बोराडे, संजय बोराडे, राजू बोराडे, विजय बोराडे, पोपट बोराडे, सुनिल बोराडे, गंगुबाई बोराडे, व किरण बोराडे आदींनी कळविले आहे.प्रतिक्रि यामाश्यांच्या वाढत्या उपद्रवाचा गेली दोन ते तीन वर्षांपासून त्रास सहन करत असून याबाबत आम्ही सदर पोल्ट्री फार्म मालक व बेलगाव कुºहे येथील आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन देखील आजपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. आता आम्ही कारवाईची अपेक्षा करीत आहेत.- राजू बोराडे.रहिवाशी. अस्वली स्टेशन.