शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या धुक्यामुळेआंबा पिक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:09 IST

खेडलेझुंगे : अत्यल्प पाऊस, अप्रतिकूल हवामान, तीव्र दुष्काळ, गेल्या पंधरवाड्यात पडलेले दाट धुके यामुळे अद्याप आंब्याला मोहर फुटलेला नाही. जानेवारी महिन्याचा शवेटचा आठवडा सुरू झालेला असुनही मोहर न फुटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे यंदाचे आंबापिक धशेक्यात असल्याचे शेतकरी बोलू लागले आहेत.

ठळक मुद्देअत्यल्प पाऊस, अप्रतिकुल हवामान व तीव्र दुष्काळी परिस्थीती

खेडलेझुंगे : अत्यल्प पाऊस, अप्रतिकूल हवामान, तीव्र दुष्काळ, गेल्या पंधरवाड्यात पडलेले दाट धुके यामुळे अद्याप आंब्याला मोहर फुटलेला नाही. जानेवारी महिन्याचा शवेटचा आठवडा सुरू झालेला असुनही मोहर न फुटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे यंदाचे आंबापिक धशेक्यात असल्याचे शेतकरी बोलू लागले आहेत.डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मोहर फुटण्यास सुरुवात होते. आता जानेवारी संपला तरीही जुन्या गावरान झाडांना मोहर आलेला नाही. आता मोहर येण्याची आशा धुसर होत चालली आहे. यावर्षीच्या वातावरणातील बदलाचा सर्वच पिकांवर परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे.सद्यस्थितीत आंबा हे एक सर्वत्र महत्वाचे पैसे मिळवून देणारे फळपीक झालेले आहे. उशिरा आलेल्या थंडीमुळे व धुक्यामुळे आंब्याची अनेक झाडे मोहरली नाहीत. काही झाडांना थोडाफार आलेला मोहर अतिथंडीमुळे करपून जात आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पूर्वी ग्रामीण भागात गावाच्या आजूबाजूला आमराई असायची त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आंब्याची किंमत वाटायची नाही. परंतु कालांतराने वृक्षतोड माफियाकडून या फळांच्या झाडाची कत्तल झाली त्यामुळे ही आमराई नामशेष झाली आहे. आता मोजक्याच शेतकऱ्यांकडे चार-दोन आंब्याची झाडे आहेत. त्यांना या वर्षी या झाडांना अजुनही मोहर फुटलेला दिसत नाही. ज्या झाडांना मोहोर आलेला आहे तोही अतिथंडीमुळे व जोराच्या वाºयामुळे गळुन पडत आहे. या वर्षी आंब्याला मोहर दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंतीत झाला आहे.गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झाडांना मोहर दिसत होता, त्यामुळे उत्पन्न चांगले मिळेल अशी शेतकºयांना आशा वाटत होती. मात्र वातावरणातील बदलत्या परिणामामुळे गतवर्षी मोहर गळून गेला होता. त्याच प्रमाणे यंदा देखिल गेल्या पंधरवड्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे आंब्याच्या मोहराला फटका बसला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या धुक्याच्या कहरामुळे व अतिथंडीमुळे सुद्धा आंब्याला याचा फटका बसत असल्याचे दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे आलेला तुरळक मोहर गाळून जात आहे. (फोटो ३१ आंबा)