शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

गाळ वाढल्याने भोजापूरच्या क्षमतेत घट

By admin | Updated: November 19, 2015 22:13 IST

लोकप्रतिनिधींवर मदार : पाटबंधारे विभागाची उदासीनता

सचिन सांगळे  नांदूरशिंगोटेसिन्नर तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या भोजापूर धरणात प्रचंड गाळ साचला असल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. धरणाच्या निर्मितीपासून एकदाही गाळ उपसण्यासाठी प्रयत्न झाला नसल्याने पाण्यापेक्षा गाळ अधिक अशी स्थिती आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी भोजापूरमधील गाळ उपसण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.या धरणातील गाळ काढल्यास पाण्याची साठवण क्षमता वाढून धरणाच्या सिंचन लाभ क्षेत्रातील शेती ओलिताखाली येऊ शकेल. मात्र त्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. नाशिक-पुणे महामार्गापासून १३ किलोमीटर अंतरावर व अकोले तालुक्यातील पाचपट्टा परिसरात उगम पावणाऱ्या म्हाळुंगी नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. ३६५ दशलक्ष घनफूट क्षमतेचे मातीचे धरण सन १९७२च्या दुष्काळात पूर्ण झाले. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, पाटबंधारे मंत्री शंकरराव चव्हाण व आमदार रुक्मिणीबाई वाजे यांच्या उपस्थितीत धरणाचे भूमिपूजन झाले होते.भोजापूर धरणाची लांबी ४८० मीटर असून, नदीपासून उंची ३८ मीटर आहे. डावा तट कालवा अंदाजे १८ किलोमीटरच्या आसपास आहे. धरणाचा १२१ दशलक्ष घनफूट निरूपयोगी पाणीसाठा आहे. या धरणावर रब्बी व खरीप हंगामात सुमारे ४००० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तसेच भोजापूर धरणावर सिन्नर तालुक्यातील मनेगावसह १७ गावे व कणकोरीसह पाच गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना आहे, तर संगमनेर तालुक्यातील गावांसाठी पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. हजारो लोकांची तहान भागविणाऱ्या व हजारो एकर शेतीला पाणी पुरवणाऱ्या धरणामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. तसेच उन्हाळ्यातील उपाययोजना म्हणून परिसरातील पाझर तलाव, बंधारे याच धरणाच्या पाण्याने भरले जातात. पावसाळ्याच्या दिवसात दोन-दोन महिने पूरपाणी सुरू असते. तसेच यातून उपसा जलसिंचन योजनेला पाणी दिले जाते. भोजापूर धरणाचे पात्र मोठे असल्याने पाण्याचा परिसर मोठा आहे. परिसराला वरदान ठरलेल्या धरणातील गाळ काढला गेलेला नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असते. गाळ साचल्यामुळे धरणाची जेवढी क्षमता आहे तेवढेही पाणी राहत नाही. धरण परिसरात जागोजागी मातीचे ढिगारे उभे राहिले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी होते. गाळ साचल्यामुळे पाण्याला वेगळाच दर्प येतो. धरणातील गाळ काढला गेल्यास पाण्याची क्षमता वाढवून मोठ्या प्रमाणात साठा होऊ शकतो.पूर्वी रब्बी हंगामात दोन आवर्तनांमध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने व गाळ साचल्याने साठवण क्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांना यातून कसेबसे एकच आवर्तन मिळत आहे. तेही लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.भोजापूर धरण नांदूरशिंगोटे व तालुक्याच्या पूर्वभागासाठी वरदान ठरले आहे. धरणाच्या पाण्यावरच परिसरातील शेती अवलंबून आहे. परंतु गेल्या ५ वर्षापासून पावसाच्या लहरीपणामुळे या भागातील शेती व्यवसाय संकटात सापडला आहे.पूर्वी धरणाच्या कालव्याची वहनक्षमता १४०च्या आसपास होती. त्यामुळे सर्व भागांना पाणी देता येत नव्हते. त्यासाठी हाती घेतलेले कालवा नूतनीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने सर्व भागांना पाणी देण्यास अडचणी येत आहेत. कालवा नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण झाल्यास लाभक्षेत्रातील सर्व भागांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार आहे. नूतनीकरणाचे काम व धरणातील गाळ काढण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत.(वार्ताहर)