शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उष्णता वाढल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 13:21 IST

मालेगाव : : खडकी : मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उष्णता वाढल्याने रोग फैलाव करणारे डास, किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिवताप आजार पसरले आहे. किटकनाशक औषधांची लवकर फवारणी करावी लागणार आहे

मालेगाव : : खडकी : मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उष्णता वाढल्याने रोग फैलाव करणारे डास, किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिवताप आजार पसरले आहे. किटकनाशक औषधांची लवकर फवारणी करावी लागणार आहे. लहान बालके व वृद्ध दगावण्याची शक्यता निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य धोक्यात आले आहे.परतीच्या पावसाची प्रतीक्षा संपली आहे. मोठा पाऊस झाला तरच डासाचे व रोगी किटकांचे प्रमाण कमी होते असे जाणकारांचे मत आहे. गावातील प्रत्येक घरातून एक रुग्ण हिवतापाने दगावला आहे. कोरडे व सुक्ष्म व उष्ण वातावरणाने आरोग्याला अपाय होत होत आहे. रुग्णांनी भरलेले दवाखाने हिवताप व सर्दी-खोकल्याचे नुमने प्राप्त होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणी व रक्त तपासणी करणे गरजेचे आहे तरच रोगावर लवकर नियंत्रण करण्यास मदत होईल.पिण्याचे पाणी दूषित व जड स्वरुपाचे असल्याने त्यातून आजारांचा फैलाव होता. शुद्ध पाणी पिण्यास मिळत नाही. विहीर व कुपनलिकेतील पाणी प्यावे लागत आहे. पूर्वी हिवतापाचे डॉक्टर गावोगावी औषध, गोळ्या देत सध्या मात्र ते दिसून येत नाही. त्यांच्या फिरण्याने साथीच्या रोगांची माहिती मिळत असत व त्यावर कीटकनाशक औषधांची फवारणी केली जात होती. मात्र फवारणी करणारे गायबच झाल्याने आरोग्याची काळजी नागरिकांना स्वत:च घ्यावी लागत आहे.शासकीय रुग्णालयांची अवस्थाही दयनीय झालेली आहेत. तेथेच डासाचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे रुग्ण रुग्णालयात जाण्यासाठी धजावत नाही. नैसर्गिक वातावरणातील बदल यामुळे रोगांची माहिती होत नाही. ग्रामस्थांची प्रतिकारशक्ती बरी असल्याने ते आजाराला लोटतात. मात्र तापाने लाल व पांढºया पेशी कमी जास्त झाल्याने रुग्ण दगावतात. प्रथमोपचाराच्या बाहेर स्थिती गेल्याने रुग्णांना दवाखान्यातच मुक्काम करावा लागतो. यामुळे आर्थिक स्थिती नसल्याने उसनवारीनेच सध्या ग्रामीण भाग आपले व्यवहार चालवताना दिसत आहे. थंडीचे वातावरण नागरिकांना तारणार आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीय