शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारभाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 19:19 IST

पाटोदा : उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढले आहे. भाववाढीमुळे खिशाला चाट बसत आहे. येवला तालुक्यातील पाटोदा येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाल्याच्या आवकेत मोठया प्रमाणात घट झाली असून भावात तेजी आली आहे

ठळक मुद्दे भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

पाटोदा : उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढले आहे. भाववाढीमुळे खिशाला चाट बसत आहे. येवला तालुक्यातील पाटोदा येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाल्याच्या आवकेत मोठया प्रमाणात घट झाली असून भावात तेजी आली आहे. या आठवडे बाजारात गवार एकशे वीस ते एकशे चाळीस रु पये किलो प्रमाणे विक्र ी होत होती. तर बटाटे दहा रु पये किलो असा कमी भावात मिळत असल्याने सर्वसामान्य नागरीक त्याकडे वळलेला दिसत आहे. तसेच उन्हाळ्यात जीवाला गारवा देणाऱ्या फळभाज्या व फळांचे देखील दर वाढले आहेत. टरबूज, खरबूज, काकडी, लिंबू यांना मोठी मागणी आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.येथील आठवडे बाजारात शेपू, पालक कोथंबीर, कांदापात यांची पंधरा रु पये जुडीने विक्र ी झाली, तर मेथी आवक कमी असल्याने वीस ते पंचवीस रु पये जुडीचे भाव होते. वांग्याची आवक जास्त झाल्याने सरासरी पंधरा ते वीस रु पये किलोस भाव मिळाला. टमाटे चाळीस रु पये किलो, काकडी, बीट, द्राक्षे, सिमला मिरची भेंडी साठ रु पये, कारले ऐंशी रु पये, हिरवी मिरची शंभर रु पये किलो, करडई, पंधरा रु पये जुडी, गिलके, दोडके, ऐंशी रु पये, भोपळा पंधरा रु पये असे सर्वसाधारण भाव होते.यंदा पाऊस कमी पडल्यामुळे या भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आहे त्या पाण्यावर शेतकरी भाजीपाला पिके घेत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असल्याने या भाजीपाला पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतात केलेला खर्चही फिटत नाही.- आशाबाई कुंभारकर, भाजीपाला उत्पादक शेतकरी.बाजारात सर्वच भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव तेजीत होते .त्यामुळे कोणती भाजी घ्यावी हा प्रश्न होता. तेजीमुळे बाजाराचे गणति कोलमडले. तरीही भाजीपाला खरेदी करणे आवशक होते.- मंगेश देवढे, ग्राहक.