शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

फसव्या कर्जमाफीमुळेच आत्महत्या वाढल्या

By admin | Updated: July 9, 2017 23:53 IST

सटाणा : शेतकरी कर्जमाफीसाठी लावलेल्या अटी रद्द करून या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी लावलेल्या अटी व शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफी देण्याबरोबरच कांद्याला हजार रुपये हमीभाव द्यावा, या मागणीसाठी बागलाण राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.कर्जमाफी योजनेत शेतकरी कुटुंब हा निकष लावण्यात आला आहे. कुटुंब शब्दाच्या व्याख्येत पती-पत्नी व अठरा वर्षांखालील मुलांचा समावेश आहे. शेतकरी पती व पत्नी या दोघांच्या नावाने स्वतंत्र कर्ज घेतले असल्यास त्या कुटुंबाला या कर्जमाफीचा फायदा मिळत नसल्यामुळे ही फसवी कर्जमाफी म्हणून शेतकरी आत्महत्येत वाढ होत असल्याचे दुर्दैवी चित्र बागलाणमध्ये बघायला मिळत असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. याप्रसंगी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रेखा शिंदे, पंचायत समिती सदस्य वसंतराव पवार, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, ज. ल. पाटील, जुनी शेमळीचे सरपंच अमोल बच्छाव, वंदना भामरे, किरण पाटील, अनिल चव्हाण, जे. डी. पवार, पांडुरंग सोनवणे, गणेश जाधव, पोपट चव्हाण, राजेंद्र सावकार, समीर देवरे, सचिन जाधव आदी उपस्थित होते. राज्य सरकारने जून २०१६ ऐवजी जून २०१७ च्या थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. सरकारने विविध तारखांचा गोंधळ घालून शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी वंचित ठेवल्याने शेतकरी हताश झाला आहे. अटी-शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.