शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतीचे नुकसान

By admin | Updated: August 4, 2016 01:12 IST

अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतीचे नुकसान

 त्र्यंबकेश्वर : गेल्या तीन दिवसात तब्बल ४२१ मि.मी. असा विक्रमी पाऊस त्र्यंबकेश्वर तालुक्यात बसरला. अवघ्या तीन दिवसांत ४२१ मि.मी.पाऊस पडणे म्हणजे रेकॉर्डच म्हणावा लागले. या तुफान पावसाच्या माऱ्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. उभी रोपे वाहून गेली आहेत. बांध फुटले. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केली आहे. त्र्यंबकला गेले तीन दिवस धुवाधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यासाठी बियाणे उपलब्ध करणे वगैरे सर्वच बाबी नव्याने करणे म्हणजे जिकिरीचे काम आहे. त्यापेक्षा शेती नाही केली ते परवडले. एवढे नुकसान कुणाला झेपणार आहे, तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशातला भाग नाही, मात्र अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी पंचनामे करून तातडीने मदत कार्य सुरू करावे. पीकविमा योजनेची मुदत वाढवून द्यावी, नदी-नाल्यांकाठी असलेल्या घरांचे व शहरात दुकानातील मालाचे नुकसान झाले आहे. तरी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अतिवृष्टीमुळे झालेल्या भात पिकांचे नुकसान, नागली, वरई, खुरासणी, उडीद, भुईमूग आदिंचे पिकांचेही नुकसान झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी ओहळ, नाले, दुथडी भरून वाहत असल्याने जमिनीदेखील खचल्या आहेत. पर्यायाने बांध फुटले आणि शेती वाहून गेली. त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कडलग यांनी एका पत्रकान्वये केली आहे.(वार्ताहर)