शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमुळे ‘समृद्धी’ महामार्गाच्या विषयाला बगल

By admin | Updated: February 10, 2017 01:13 IST

प्रशासनही थंड : विरोधी उमेदवारांकडून प्रचाराचा मुद्दा

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी गेल्या महिन्यापर्यंत आग्रही असलेल्या प्रशासनाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा माहोल लक्षात घेता, आपली पावले संथ केली असून, दुसरीकडे महामार्गासाठी जागा संपादित करू पाहणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी निवडणुकीत हाच प्रचाराचा मुद्दा करून त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुंबई-नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतील ४६ गावांमधून जाणार असून, त्यासाठी शासनाने रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून महामार्गाच्या बांधणीत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची व त्यांच्या गटाची माहिती संकलित करून ती लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून संपादित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम खाते व भूमी अभिलेख खात्याच्या संयुक्त मोजणीला जमीनमालकांनी विरोध केल्यानंतर शासनाने त्यावर पर्याय म्हणून ड्रोनच्या सहाय्याने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात न जाता मोजणीही करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही कडाडून विरोध करण्यात आला असतानाही रस्ते विकास महामंडळाने प्राधिकृत केलेल्या प्राधिकारी अधिकाऱ्यांनी या दोन्ही तालुक्यात महामार्गासाठी लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केल्या व त्यावर जागामालकांच्या हरकती तसेच सूचना मागविल्या असता, गावेच्या गावे या अधिसूचनेच्या विरोधात उभ्या ठाकून त्यांनी जमीन देण्यास विरोध असल्याचे लेखी पत्रेच शासनाकडे सादर केलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मंत्रालयात बैठका आयोजित करून खुद्द फडणवीस यांनीच लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून जमीन संपादित करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग व्हावा व त्यासाठी शेतकऱ्यांना हवा तितका मोबदला देण्याची तयारीही शासनाने दर्शविली. परिणामी गेल्या सहा महिन्यांपासून शासकीय पातळीवर जागामालक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक भेटी घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालविला होता. महामार्गासाठी जागा संपादित करताना सरकारविरुद्ध वातावरण निर्माण होऊ नये याची काळजीही त्यांनी घेतली. तथापि, विरोधी पक्षांनी या महामार्गासाठी जमीन संपादित करण्यास विरोध दर्शवून जागामालक शेतकऱ्यांच्या पाठीशी आपले बळ उभे केल्याने सत्ताधारी भाजपाची अडचण झाली. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू असून, त्यासाठी ‘समृद्धी’ च्या जागा संपादनाचा विषय प्रचाराचा मुद्दा करण्यात आला आहे.