शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या मांजरपाड्याने दुष्काळाच्या झळा

By admin | Updated: August 27, 2016 00:07 IST

रखडलेल्या मांजरपाड्याने दुष्काळाच्या झळा

कायमदत्ता महाले येवलायंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नद्या, नाले ओसंडून वाहिले. मात्र येवला तालुका कोरडाच राहिला. तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला वरदान ठरणारा मांजरपाडा प्रकल्प राजकीय इच्छाशक्तीचा अभावामुळे रखडलेला असल्यामुळे दुष्काळाच्या छटा कायम आहेत. दमदार नेतृत्वाच्या अभावामुळे मांजरपाडा प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्यासाठी अनंत अडचणी येत आहेत. सत्तेचा वापर मांजरपाडा प्रकल्प मार्गी लावण्याकडे होत नसल्याचे चित्र आहे. प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नसून शांत झालेल्या आंदोलनाची वात पेटवण्याचा प्रयत्न लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सर्वपक्षांच्या मदतीने केला. पुणेगाव-दरसवाडी कालव्याची चाचणी घेण्यासाठी पाणी सोडावे,अशी मागणी रेटली गेली.एकीचे बळ म्हणून काही प्रमाणात प्रशासन हलले असले तरी,प्रत्यक्ष चाचणीची वाट पहावी लागेल. निधीअभावी रखडलेले राज्यातील प्रकल्प निधी देऊन पूर्ण केले जातील व सिंचन क्षमतेत वाढ करण्याचे जलसंपदा खात्याचे उद्दीष्ट असल्याचे सुतोवाच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मध्यंतरी केल्याने येवला तालुक्याच्या अस्मितेचा मांजरपाडा प्रकल्प मार्गी लागणार अशी चर्चा दोन महिन्यांपूर्वी सरू झाली होती. परंतु अंतिम टप्प्यात येऊन ठप्प झालेले मांजरपाडयाचे काम निधीअभावी अद्यापही रखडलेलेच आहे. नियोजनांत असलेला निधी इतरत्र वळवला गेल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे. सुरगाणा तालुक्यातील केम पर्वतरांगामधून पश्चिम वाहिनी नद्यांचे ६०६ दशलक्ष घनफूट पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा वळण योजनेचे काम सध्या ठप्प झाले आहे. जलसंपदा व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही मांजरपाडा- १ वळण योजनेबाबत आता थेट कार्यवाहीसाठी प्रयत्न करावेत अशी हाक अनेक वेळा दिली गेली. परंतु अद्यापही येवला तालुकावासीयांना दिलासा मिळाला नाही. मांजरपाडा- १ वळण योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ४५४ कोटी रु पयांची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज आहे. तसेच आघाडी शासनाने मंजूर केलेले सन २०१४-१५ साठीचे ७० कोटी रु पयांचे अनुदान प्रशासकीय मान्यतेअभावी अखर्चित राहिले आहे. त्यामुळे त्यातीलच २८ कोटीचा निधी गोदावरी महामंडळाने इतर प्रकल्पासाठी वळविला. २०१४-१५ च्या मंजूर अनुदानाला २०१५-१६ मध्ये खर्च करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्याची गरज आहे. आता युती सरकारकडे मांजरपाडा वळण योजनेसाठी ४५४ कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत लालिफतीत अडकलेला प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागाच्या या प्रकल्पाचे केवळ ७५० मीटर एवढ्या लांबीच्या बोगद्यासह काही पूल व अल्पखर्चाची कामे बाकी आहेत. येवल्याच्या उत्तरपूर्व भागात थेट डोंगरगावपर्यंत पाटातून पाणी पाहण्यासाठी तीन पिढ्या खपल्या आहेत. मांजरपाड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. श्रेयवादासह राजकीय लढाई निवडणुकीत राजकीय पक्षांनी जरूर खेळावी, पण तालुक्याच्या या पाणीप्रश्नावर तत्काळ निर्णय घ्यावा. सत्ताधार्यांनी या कामात आता सारे कौशल्य पणाला लावावे अशी अपेक्षा आहे. सत्तेत नसताना भाजपानेदेखील हा प्रकल्प मार्गी लागावा म्हणून भाषणबाजी केली आहे. आता मात्र निर्णायक लढ्यात उत्तरपूर्व भागात पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे.सर्वपक्षीय आंदोलन उभारण्याची तयारी या भागातील शेतकर्यांनी चालवली आहे.अस्मितेच्या पाणीप्रश्नासाठी पक्षाचे जोडे बाजूला सारून आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता आहे.