शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

तळवाडे परिसरात दुष्काळाची तहसीलदारांकडून पहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 17:59 IST

सायखेडा : निफाड ,सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे,महाजनपुर, भेंडाळी, औरंगपूर,बागलवाडी या गावात भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका ,भाजीपाला, ऊस यासह इतर सर्व बागायती पिके पाण्याअभावी करपून गेल्याने करपलेल्या पिकांची पहाणी निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यासह कृषी अधिकारी, सर्कल तलाठी यांनी केली

ठळक मुद्दे तहसीलदार दीपक पाटील यांनी प्रत्यक्ष पहाणी करून जिल्हा स्तरावर अहवाल देणार

सायखेडा : निफाड ,सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे,महाजनपुर, भेंडाळी, औरंगपूर,बागलवाडी या गावात भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका ,भाजीपाला, ऊस यासह इतर सर्व बागायती पिके पाण्याअभावी करपून गेल्याने करपलेल्या पिकांची पहाणी निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यासह कृषी अधिकारी, सर्कल तलाठी यांनी केलीजून मिहन्यात जेमतेम पाऊस झाल्याने शेतकर्यांनी शेतात खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली तीन मिहने उलटूनही पाऊस पडला नाही परतीच्या पावसाने पाठ फिरवली त्यामुळे जून मिहन्यात पेरणी केलेली पिके पूर्णपणे करपून गेली शेताच्या मशागतीपासून ते पिकाचे बियाणे, खुरपणी यासाठी हजारो रु पये शेतकर्यांचे वाया गेले कोणताही आर्थिक फायदा होणार नाही पिके करपली, जनावरांचा चारा वाळून खाक झाला, पाऊसच पडलेला नसल्याने विहिरींना पाणी आले नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतात राहणार्या नागरिकांना कुपनलिकेचे पाणी येत नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आत्ताच कठीण झाला असल्याने भयानक दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत निफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागातुन गोदावरी नदी वहात असली तरी सीमेवर या नदीच्या पाण्याचा कोणताही फायदा होत नाही त्यामुळे या गावत लवकर दुष्काळाच्या झळा पोहचत आहे. या भागातील पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच लता सांगळे, सोपान खालकर यांनी दैनिक लोकमतच्या माध्यमातून बातमीद्वारे केली होती. प्रशासनाने दखल घेत तहसीलदार दीपक पाटील यांनी प्रत्यक्ष पहाणी करून जिल्हा स्तरावर अहवाल देणार आहे. राज्य स्तरीय पथक लवकरच पहाणी करून शासनाला अहवाल सादर करणार आहे यावेळी भीषण दुष्काळ असल्याचे स्पष्ट दिसून आले यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर,सोपान खालकर, सरपंच लता सांगळे,बचवन्त फड,दीपक कमानकर, ग्रामसेवक रहाणे,खाटेकर, तलाठी भोई, राजेंद्र सांगळे यासह शेतकरी उपस्थित होते.