शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘सेतू’च्या दप्तर गायबमुळे शासकीय नोकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 20:04 IST

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चालविण्यात आलेल्या सेतू केंद्राचे गेल्या तीन वर्षांपूर्वीचे कोणतेही दप्तर सापडत नसल्याने शासकीय नोकरीसाठी पात्र ठरलेले परंतु कागदपत्र तपासणीत अडकलेल्या शासकीय नोकरदारांची नोकरी संकटात सापडली आहे. तीन वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या दाखल्यांच्या पडताळणीअभावी नियुक्तीपत्र मिळत नाही, दुसरीकडे दप्तर सापडत नसल्याचे कारण जिल्हाधिकारी कार्यालय देत असल्याने मग जावे कुठे, ...

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चालविण्यात आलेल्या सेतू केंद्राचे गेल्या तीन वर्षांपूर्वीचे कोणतेही दप्तर सापडत नसल्याने शासकीय नोकरीसाठी पात्र ठरलेले परंतु कागदपत्र तपासणीत अडकलेल्या शासकीय नोकरदारांची नोकरी संकटात सापडली आहे. तीन वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या दाखल्यांच्या पडताळणीअभावी नियुक्तीपत्र मिळत नाही, दुसरीकडे दप्तर सापडत नसल्याचे कारण जिल्हाधिकारी कार्यालय देत असल्याने मग जावे कुठे, असा प्रश्न नोकरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पडला आहे.नागरिकांना विविध प्रकारचे शासकीय दाखले देण्यासाठी पंधरा ते सतरा वर्षांपासून सेतू केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून, खासगी व्यक्तीमार्फत ही केंद्रे चालवून त्यांच्याकरवी शासकीय दाखले तयार करून ते शासकीय प्राधिकृत अधिका-यांकडून साक्षांकन करून घेण्याच्या या पद्धतीमुळे शासकीय दाखले मिळण्याचा मार्ग सुकर होण्यास मदत झाली. परंतु शासनाकडून दर वर्ष- दोन वर्षांनंतर सेतू केंद्रचालक बदलण्यात आले. परिणामी या केंद्रचालकांनी त्यांच्या कार्यकाळात तयार केलेल्या दाखल्यांसाठी नागरिकांनी दिलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रतीचे दप्तर सांभाळण्याच्या जबाबदारीकडे सेतू केंद्रचालक व जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. आजवर या सेतू केंद्राकडून लाखो नागरिकांना जात, वय व अधिवास, राष्टÑीयत्व, उत्पन्न, नॉन क्रीमिलेअरचे दाखले दिले गेले व या दाखल्यांच्या आधारे शासकीय नोकरीसाठी काही पात्रही ठरले. शासकीय नोकरीसाठी सेतू केंद्रातून दाखले मिळविलेल्या उमेदवारांनी अर्ज केले व त्यात ते पात्रही ठरल्यानंतर त्यांनी सादर केलेल्या शासकीय कागदपत्रांची पुनर्पडताळणी केल्याशिवाय नोकरीचे नियुक्तीपत्र मिळत नाही. अशा वेळी सेतू केंद्रामार्फत ज्या शासकीय अधिका-याच्या स्वाक्षरीने दाखले दिले गेले त्या अधिका-याच्या कार्यालयाने उमेदवाराला दिलेल्या दाखल्याची पडताळणी पत्र सादर करावे लागते. परंतु गेल्या तीन वर्षांपूर्वीचे कोणतेही दप्तर जिल्हाधिकारी कार्यालयात सापडत नसल्याची उत्तरे नोकरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना ऐकावी लागत आहेत. ज्या-ज्या अधिका-यांनी शाासकीय दाखल्यांवर स्वाक्षरी केली त्यांच्या आता बदल्या झाल्या असल्याने त्यांच्या कार्यालयातील विद्यमान अधिकाºयांनी सदरचे दाखले आपले कार्यालयाने दिल्याचे प्रमाणपत्र उमेदवारांना द्यावे असे अपेक्षित असले तरी, आता कोणताही अधिकारी त्याबाबतची जोखीम स्वीकारण्यास तयार नाही. कारण सेतू केंद्राचे कोणतेही दप्तर कोणत्याच कार्यालयात उपलब्ध नाही. अधिका-याने दप्तर न पाहताच दाखल्याची जोखीम पत्करली आणि पुढे काही घडल्यास सदरचा अधिकारी गोत्यात येण्याची भीती आहे.