शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

निविदाप्रक्रियेला ताप्तुरती स्थगिती

By admin | Updated: May 19, 2015 01:56 IST

निविदाप्रक्रियेला ताप्तुरती स्थगिती

नाशिक : मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा योजनेच्या निविदाप्रक्रियेसंबंधी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह काही नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनंतर राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशान्वये योजनेच्या निविदाप्रक्रियेला ताप्तुरती स्थगिती दिली आहे. सायंकाळी आयुक्तांना सदर स्थगिती आदेशाचा फॅक्स प्राप्त झाला. विशेष म्हणजे मंगळवारी (दि.१९) होणाऱ्या महासभेत योजनेच्या अतिरिक्त ३६ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी ठेवला असून, या स्थगितीमुळे आयुक्तांकडून प्रस्ताव मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, निविदाप्रक्रियेची चौकशी पूर्ण होईपर्यंत योजना पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे. मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी किमान दराची निविदा प्राप्त झालेल्या चेन्नईतील लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने २६६ कोटी रुपये इतका अंतिम देकार दर्शविल्याने मूळ मान्यतेच्या २३० कोटींपेक्षा दहा टक्के जादा म्हणजे ३६ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा महापालिकेवर पडणार आहे. या अतिरिक्त रकमेस तसेच योजनेतील काही तांत्रिक बदलांसंबंधीचा प्रस्ताव आयुक्तांनी मंगळवारी होणाऱ्या महासभेत मान्यतेसाठी ठेवला आहे; परंतु तत्पूर्वीच महासभेच्या पूर्वसंध्येला योजनेच्या निविदाप्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देणारा आदेश आयुक्तांना पाठविण्यात आला.