शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे करण्यात दुजाभाव

By admin | Updated: September 19, 2015 22:33 IST

समस्या : प्रभाग ४८ मध्ये लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

नाशिक : प्रभागात असलेली अस्वच्छता, घंटागाडीची अनियमितता, ठरावीक भागात सातत्याने होत असलेली विकासकामे, प्रभागातील रस्त्यांवर डांबरीकरण नाही, पाण्याचे नादुरुस्त व्हॉल्व्ह अशा एक ना अनेक तक्रारींनी कामटवाडे येथील प्रभाग क्रमांक ४८ सध्या नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.प्रभाग ४८ अंतर्गत येणारे कामटवाडे, निखिल पार्क, अंबिकानगर, अभियंतानगर, धन्वंतरी मेडिकल कॉलेज, वृंदावन कॉलनी आदि परिसरात ठरावीकच ठिकाणी विकासकामे होत आहेत. याभागात नागरीकरणात झपाट्याने वाढ होत असून सदनिकांमध्ये सातत्याने होणारी वाढ यामुळे रस्ते अरुंद होत चालले आहेत. रस्ते अरुंद होत चालल्याने प्रभागात घंटागाडी प्रत्येक घरापर्यंत पोहचणे मुश्कील झाले आहे. घंटागाडी ज्या ठिकणी पोहचत नाही त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहेत. काही दिवसांपूर्वी नगरसेवक अनिल मटाले यांनी महापौर अशोक मुर्तडक आणि राहुल ढिकले यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन केले असले तरी संपूर्ण प्रभागात विकासकामे होत आहेत असे नाही. दोन ठिकाणी असलेली व्हॉल्व्ह नादुरुस्तीची समस्या आडनावात साधर्म्य असलेल्यांच्या मळ्याला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी केली असावी असा संशय निर्माण न झाला तरच नवल. कारण एका ठिकाणी तातडीने समस्येचे निराकरण आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र सातत्याने वाया जाणारे पाणी असा विरोधाभास का असा प्रश्न नागरिकांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

नगरसेवक फिरकलेच नाहीअंबिकानगर भागात गेल्या आठवड्यापासून पाण्याचे व्हॉल्व्ह दोन ठिकाणी नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक मटाले यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता  परस्पर व्हॉल्व्ह दुरुस्त करणार्‍या व्यक्तीचा संपर्क क्रमांक देऊन धन्यता मानली. एकीकडे पाणी कपातीचे संकट गडद असताना व्हॉल्व्हमधून सातत्याने होणारी पाणी गळती बघण्यासाठी आणि तातडीने पाणी गळती रोखण्याच्या दृष्टीने  नगरसेवकांनी भेट देणे आवश्यक असताना नगरसेवक याठिकाणी फिरकलेच नसल्याचे धक्कादायक चित्र बघायला मिळाले.