शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मताधिक्यात घट झाल्याने शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 01:16 IST

देशात वा राज्यात कोणतीही लाट असली तरी ‘व्यक्तीनिष्ठ’ राजकारणाचा प्रभाव असलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात व्यक्ती पाहून मतदान केले जाते, याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आला.

देशात वा राज्यात कोणतीही लाट असली तरी ‘व्यक्तीनिष्ठ’ राजकारणाचा प्रभाव असलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात व्यक्ती पाहून मतदान केले जाते, याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आला. विधानसभेलाही पक्षापेक्षा व्यक्तीनिष्ठेलाच सिन्नरकर जवळ करतील म्हणून लोकसभेची आकडेवारी पुन्हा विधानसभेला हीच असेल, असे म्हणणे धाडसाचे होईल!सिन्नर मतदारसंघात सुमारे तीन लाख मतदार असल्याने कोकाटे लोकसभा निवडणुकीत सिन्नरच्या जोरावर टक्कर देतील असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे कोकाटे यांनी सिन्नर मतदारसंघात आघाडी घेतली. कोकाटे स्थानिक असूनही पाहिजे त्या प्रमाणात सिन्नर विधानसभा मतदारसंघात त्यांना मताधिक्य मिळविता आले नाही. असे असले तरी त्यांनी शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यापेक्षा सुमारे ३४ हजार ५०० मतांनी आघाडी घेतली. एकमेव सिन्नर मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार गोडसे यांना रोखण्यात कोकाटे यांना यश मिळाल्याचे दिसून आले. मात्र अन्य मतदारसंघात कोकाटेंची जादू चालली नाही. सिन्नरकरांनी व्यक्तीनिष्ठा जपल्याचे आकडेवारीहून दिसून आले. गेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना १ लाख ४ हजार ३१ मते मिळाली होती. तर भाजपाचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांना ८३ हजार ४७७ मते मिळाली होती. विधानभा निवडणुकीपेक्षा कोकाटे यांना लोकसभेच्या निवडणुकीत ७ हजार ६३७ मते जास्त मिळाली आहेत. २०१४ च्या विधानसभेला २ लाख ७१ हजार मतदार होते. तर २०१९ च्या लोकसभेला सुमारे ३ लाख मतदार होते. म्हणजे सुमारे २९ हजार मतदार वाढले होते. त्या तुलनेत कोकाटे यांना मते वाढल्याचे दिसून आले.येत्या विधानसभा निवडणुकीत युतीकडून राजाभाऊ वाजे पुन्हा उमेदवारी करू शकतात. वाजे यांच्यासमोर लढत देण्यासाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे किंवा त्यांची कन्या जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांना माहिती आहे. त्यामुळे आगामी विधानसभेची लढत वाजे विरुध्द कोकाटे अशीच रंगेल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मते मिळाली यापेक्षाकोणत्या व्यक्तीचा प्रभाव सिन्नरकरांवर जास्त राहिल यावरच विधानसभेचा निकाल ठरेल.मात्र, कोकाटे पुन्हा विधानसभेची उमेदवारी करतात का, यावर सिन्नरकरांची नजर असणार आहे.कोकाटेंच्या भूमिकेकडे लक्षविधानसभेची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अगोदर विधानसभा आणि आता लोकसभेला पराभूत झालेले कोकाटे विधानसभेला पुन्हा उमदेवारी करतात का याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. कोकाटेंनी उमेदवारी केलीच तर ते अपक्ष राहतात का राष्टÑवादीत प्रवेश करतात याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. ऐनवेळी कोकाटे त्यांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांनाही विधानसभेच्या रणांगणात उभे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, कोकाटे यांना लोकसभेला मिळालेली ९१ हजार मते दुर्लक्षून राजाभाऊ वाजे यांनाही चालणार नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिक