लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक :रविवार कारंजा, मेनरोड, फूलबाजार आदि ठिकाणच्या भाजी दुकाने आज मालाअभावी बंद पडली असून, ग्राहकांना रिकाम्या हातांनी परतावे लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. बाजार समितीत फळे, भाज्या आदि मालच आला नसल्याने भाजीविक्रेत्यांना मालच मिळाला नसून दुकाने बंद ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याने आज शहराच्या मध्यवर्ती भागातील लहान-मोठ्या भाजीमंडई ओस पडलेल्या दिसत होत्या. कांदा, बटाटा घेऊन एखाद दुसरे दुकान उघडलेले दिसले. हिरव्यागार, रंगबिरंगी भाज्यांनी सजलेली, ग्राहकांनी गजबजलेली दुकाने आज सुनीसुनी वाटत होती. संपाचा पूर्वकल्पना असल्याने ग्राहकांनीही जमेल तशी जास्तीची भाजी खरेदी करून ठेवली असल्याने संपाची तीव्रता त्यांना जाणवली नाही, तर खरेदी केलेला सर्व माल विकला गेल्याने विक्रेतेही दुकान बंद ठेवून घरी आराम करण्यावर भर देत आहेत.
ंशहरातील भाजीमंडई पडल्या ओस
By admin | Updated: June 3, 2017 00:14 IST