शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीमुळे अनेकांची व्यसनमुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:16 IST

नाशिक : कोरोनाच्या संचारबंदीमुळे अनेकांनी आपल्या व्यसनांवर नियंत्रण मिळविले असल्याचे दिसून येत असून काळ्या बाजारातून एवढ्या महागाने वस्तू खरेदी करून क्षणिक समाधान मिळविण्यापेक्षा ते न केलेलेच बरे असा विचार अनेकांनी सुरू केला असून, गप्प राहणे पसंत केले आहे.

नाशिक : कोरोनाच्या संचारबंदीमुळे अनेकांनी आपल्या व्यसनांवर नियंत्रण मिळविले असल्याचे दिसून येत असून काळ्या बाजारातून एवढ्या महागाने वस्तू खरेदी करून क्षणिक समाधान मिळविण्यापेक्षा ते न केलेलेच बरे असा विचार अनेकांनी सुरू केला असून, गप्प राहणे पसंत केले आहे.मागील सुमारे महिनाभरापासून जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. सुरु वातीचे काही दिवस बरे वाटत असले तरी आता मात्र त्याची तीव्रता जानवू लागली आहे. बाजारात अनेक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी या वस्तुंचा काळा बाजार सुरू आहे. छापील किमतीपेक्षा चौपट दराने या वस्तूंची विक्र ी केली जात आहे. या वस्तू जीवनावशक नसल्याने कुणी त्याची तक्र ार करत नाही. दहा रुपयाना मिळणारी तंबाखूची पुडी ४० रुपयांस, तर जादा विक्र ी न होणारी ५ ते ८ रुपयांची पूडी १५ ते २० रुपयांना विकली जात आहे. अधिकृत मद्य विक्रीची दुकाने सध्या बंद आहेत. यामुळे अनधिकृत मद्यविक्रीला ऊत आला आहे. १३० ते १६० रुपयांना मिळणारी विदेशी मद्याची बाटली चक्क ५०० ते ५५० रुपयांना विकली जात असल्याची चर्चा आहे. ८० ते १०० रुपयांना मिळणारी देशी मद्याची बाटली ३०० ते ३५० रुपयांपर्यंत विकली जात असल्याचे बोलले जात आहे.हाताला काम नाही, पुढे काम मिळेल की नाही याची शास्वती नाही. थकलेला पगार मिळेलच याची खात्री नाही. यामुळे हाती असलेला पैसा व्यसनावर खर्च करण्यापेक्षा तो पुरु न पुरवून वापरण्यातच अनेकांनी धन्यता मानली आहे. अनेकजण गेल्या काही दिवसांपासून आशा वस्तूंची खरेदी टाळत आहेत. परिणामी अनेकजण व्यसनापासून दूर जाऊ लागले आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे घरातील कर्त्यापुरु षांचे व्यसन सुटत असल्याने घरातील गृहिणींच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक