शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

माकपाच्या भूमिकेने आश्चर्य, अपात्रतेऐवजी हकालपट्टी

By admin | Updated: March 23, 2017 01:35 IST

नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षातून दोघा सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या माकपाच्या कारवाईचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षातून दोघा जिल्हा परिषद सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या माकपाच्या कारवाईचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, माकपाचे गटनेते रमेश बरफ यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.  नाशिक महापालिकेत पक्षबदल करणाऱ्या माकपाच्या दोघा नगरसेवकांविरोधात पक्षाने विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करीत त्यांचे नगरसेवक पद अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. तांत्रिकदृष्ट्या ही मागणी रास्त असल्याने दोघा नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. त्याउलट जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाची तटस्थ राहण्याची भूमिका असताना आणि तसा पक्षादेश (व्हीप) बजावला असताना दोन सदस्य अनिता बोडके व ज्योती जाधव यांनी पक्षविरोधी भूमिका घेत शिवसेना व कॉँग्रेसला मतदान केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याऐवजी माकपाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. तांत्रिकदृष्ट्या हा निर्णय पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांच्याच हिताचा असल्याची चर्चा आहे. दोन तृतीयांश म्हणजे ३ पैकी २ सदस्य फुटल्याने पक्षविरोधी कायद्यांतर्गत या दोघा सदस्यांवर कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याउलट या दोघा सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करीत त्यांना आगामी विषय समिती निवडणुकांमध्ये नेमकी काय भूमिका घ्यायची यासाठी एकप्रकारे मोकळीकच दिल्याचा राजकीय तज्ञ्जांचा व्होरा आहे. त्यामुळे एकूणच माकपाचा  हा दोन सदस्यांच्या हकालपट्टीचा निर्णय तसा आश्चर्यकारक मानला जात आहे. (प्रतिनिधी)