शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

खड्यांच्या दुरु स्तीसाठी रस्त्यात घटस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 16:45 IST

इगतपुरी : घोटी सिन्नर महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत. ह्या रस्त्याची डागडुजी होत नसल्याच्या निषेधार्थ जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणींनी बुधवारी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या घोषणा दिल्या. महामार्गावरील खड्यांचे विधिवत पूजन करून रस्त्यात घटस्थापना केली.

ठळक मुद्देमहामार्ग : महाआरती नंतर बांधकाम खात्याकडून तात्काळ दुरुस्ती सुरू

इगतपुरी : घोटी सिन्नर महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत. ह्या रस्त्याची डागडुजी होत नसल्याच्या निषेधार्थ जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणींनी बुधवारी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या घोषणा दिल्या. महामार्गावरील खड्यांचे विधिवत पूजन करून रस्त्यात घटस्थापना केली.जिजाऊ वंदना आणि देवीची महिलांनी महाआरती करीत प्रशासनाला सद्बुध्दी द्यावी अशी प्रार्थना केली. शेवटी पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी आवश्यक पावले उचलणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. त्यानंतर तात्काळ रस्त्याच्या दुरु स्तीचे काम सुरू करण्यात आले.घोटी पासून इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणारा सिन्नर पर्यंतचा महामार्ग अनेक महिन्यांपासून खड्यांच्या विळख्यात सापडला आहे. ह्या रस्त्यावरून प्रवास करतांना सामान्य नागरिक आणि वाहनधारक प्रचंड वैतागले आहेत. एसएमबीटी रु ग्णालय ह्याच मार्गावर आहे. अपघातांची संख्या वाढून अनेकांचे जीव जात आहेत. प्रत्येकाला ह्या रस्त्यातील खड्यांनी नको नको केले असल्याने ह्या रस्त्याची नवरात्रीपूर्वी डागडुजी करावी ह्या मागणीसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष कांचन दिघे- सहाणे आदी महिलांनी इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदन दिले होते. मात्र ह्या निवेदनानंतर १५ दिवस उलटूनही याबाबत प्रशासनाने गांभीर्य न घेतल्याने रस्त्यातील खड्यांत घटस्थापना केली. वाडीवºहे पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक तृप्ती आठवले, घोटीचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, नांदगाव बुद्रुकचे मंडळ अधिकारी नितीन बाहीकर, घोटीचे मंडळ अधिकारी श्याम बोरसे, बांधकाम अधिकारी संजय पाटील, पृथ्वीराज खोकले, तहसीलचे पंकज पाटील यांनी संतप्त जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांंशी चर्चा केली. रस्त्यातील घटस्थापना अध्यात्मिक भावनांशी निगडीत असल्याने विटंबना होऊ नये म्हणून त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. ह्या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर प्रयत्न करून हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याचा शब्द अधिकाºयांनी दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.आंदोलनानंतर तात्काळ १५ मिनिटात काम सुरूजिजाऊ ब्रिगेडच्या आंदोलनानंतर तात्काळ दखल घेत वघ्या मिनीटात बांधकाम विभागाचे अधिकारी व कामगार डांबर व खडीची गाडी घेवून आले व लगेच खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आल्याने महिलांनी प्रशासनाचे आभार मानले.प्रतिक्रि या....घोटी सिन्नर या महत्वाच्या रस्त्यातील खड्यांमुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे महिलांना कर्ता पुरु ष गमावल्याने अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागते. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लाज सोडली आहे. तात्काळ दुरु स्ती न झाल्यास मंत्री आणि अधिकारी फिरू देणार नाही.- माधुरी भदाणे, प्रदेश कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड.