शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

संविधानामुळे भारत देश एकसंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:03 IST

विविध जात, धर्म, प्रांत, भाषा, परंपरा आणि संस्कृतीने नटलेल्या खंडप्राय भारत देशाला संविधानाने एकसंध ठेवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात केलेल्या तरतुदी या भारतीयांना मध्यवर्ती ठेवून केलेल्या आहेत. कोणत्याही देशाने कितीही वक्रदृष्टी ठेवली तरी जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत हा देश एकसंध राहील, असा आत्मविश्वास सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देहेमंत गोखले : येवला येथे प्रागतिक व्याख्यानमाला

येवला : विविध जात, धर्म, प्रांत, भाषा, परंपरा आणि संस्कृतीने नटलेल्या खंडप्राय भारत देशाला संविधानाने एकसंध ठेवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात केलेल्या तरतुदी या भारतीयांना मध्यवर्ती ठेवून केलेल्या आहेत. कोणत्याही देशानेकितीही वक्रदृष्टी ठेवली तरी जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत हा देश एकसंध राहील, असा आत्मविश्वास सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी व्यक्त केला.येथील समता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित प्रागतिक विचार व्याख्यानमालेत ‘भारतीय संविधानाने सामान्य माणसाला काय दिले?’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना न्या. गोखले बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे होते.प्रारंभी माजी आमदार मारुतीराव पवार यांच्या हस्ते कुंडीतील वृक्षाला पाणी घालून व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहकार नेते अंबादास बनकर, तहसीलदार रोहिदास वारुळे, येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे व्यासपीठावर उपस्थित होते.दरम्यान, भारतीय सेना दलात २८ वर्षे सेवा करून निवृत्त झालेले साताळी येथील भूमिपुत्र अरुण नामदेव कोकाटे यांचा न्या. गोखले यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी मेजर कोकाटे यांच्या मातोश्री मुक्ताबाई कोकाटे, पत्नी ज्योती कोकाटे उपस्थित होत्या. मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ. गमे यांनी केले. प्रा. अर्जुन कोकाटे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी संत तुकाराम महाराजांच्या सुंदर ते ध्यान, उभा विटेवरी या अभंगावर नृत्य सादर केले. पाहुण्यांचा परिचय अ‍ॅड. बाबासाहेब देशमुख यांनी करून दिला. दिनकर दाणे यांनी आभार मानले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक