शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

टॅँकर आपल्या दारी संकल्पनेमुळे दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:25 IST

देवळा : शहरात पाण्याची तीव्र टंचाईदेवळा : शहरात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेले असताना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी ही संकल्पना राबवित टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे नागरिकांना नगरपंचायतीचे पाण्याचे टँकर आधार ठरत आहेत.

देवळा : शहरात पाण्याची तीव्र टंचाईदेवळा : शहरात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेले असताना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी ही संकल्पना राबवित टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.लोहोणेर येथे गिरणा नदीत असलेल्या उद्भव विहिरीवर व कूपनलिकांवर देवळा शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. गिरणा नदीतून हे पाणी सरस्वती वाडी येथील जलकुंभात टाकण्यात येथे व नंतर ते वितरित केले जाते. गिरणा नदीला चणकापूर व पुनंद धरणातून पाण्याचे आवर्तन सुटते. त्या काळात देवळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू असतो; परंतु गिरणा नदीपात्र कोरडे झाले की शहराचा पाणीपुरवठा ठप्प होतो व शहरात पाणीटंचाई निर्माण होते.गिरणा नदीला पुढचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यावर शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होतो; परंतु या आवर्तनांच्या मधील काळात नगर पंचायतीला शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी यातायात करावी लागते. सरस्वतीवाडी येथील पाण्याचा जलकुंभ भरला की शहरात आळीपाळीने सर्व भागात पाणीपुरवठा केला जातो. यामुळे पाणी सोडण्याची वेळ जलकुंभ भरण्यावर अवलंबून असते. सध्या आठ दिवसांतून अर्धा तास नळांना पाणी येते; परंतु त्याने शहरातील नागरिकांची गरज भागत नाही व पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.नगरपंचायतीने यातून मार्ग काढत टँकर आपल्या दारी ही संकल्पना राबवित सहा टॅँकरद्वारे शहर व उपनगरात पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रत्येक घरापुढे टॅँकर उभा करून घरासाठी २०० लिटर पाणी दिले जात आहे. यामुळे टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांची गर्दी, गोंधळ तसेच पाण्याची नासाडी होत नाही. ज्या घरापुढे टँकर आला की त्या घरातील महिलांना शांतपणे पाणी भरता येते. तिसऱ्या दिवशी शहराच्या प्रत्येक भागात पाण्याचा टँकर येत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सुसह्य होत आहेत. गिरणा नदीला पुढील आवर्तन येईपर्यंत नागरिकांना नगरपंचायतीचे पाण्याचे टँकर आधार ठरत आहेत.