शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

By admin | Updated: August 6, 2014 00:45 IST

स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

  मनमाड :सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असल्याचे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी यांनी केले. मनमाड येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या आंतरशालेय स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, संचालक गौतम संचेती, सुरेश शिंदे, अजय सोनवणे, कल्पेश बेदमुथा, प्रदीप गुजराथी, दगडू गुजराथी, प्रज्ञेश खांदाट हे व्यासपीठावर उपस्थित होते.नितीन पांडे यांनी वाचनालयाच्या विविध उपक्र्रमांचा आढावा प्रास्ताविकातून घेतला. वक्तृत्व स्पर्धेत रुची वाले, निबंध स्पर्धेत अथर्व देशपांडे, धनश्री सोनवणे, तर कथाकथन स्पर्धेत सिद्धी देशपांडे प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. मरेमा विद्यालयात स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. गौतम संचेती यांनी वाचनालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कथाकथन तसेच नियोजित विषयावर बहारदार वक्तृत्व सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. या अंतर्गत वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रकाश शेवाळे, सोनाली कुलकर्णी, गिरीश जोशी यांनी तर निबंध स्पर्धेसाठी विजय पाटील व प्रमोद मुळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन कल्पेश बेदमुथा यांनी केले. (वार्ताहर)