शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

झाड कोसळल्याने कॅम्पातील वीज गायब

By admin | Updated: June 26, 2017 00:28 IST

ंमालेगाव कॅम्प : शहरात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. तुरळक पाऊस व वादळी वाऱ्यामुळे सतत वीज खंडित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव कॅम्प : शहरात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. तुरळक पाऊस व वादळी वाऱ्यामुळे सतत वीज खंडित होत आहे. काल मध्यरात्री कॅम्प रस्त्यावर ११ केव्ही वीजतारांवर झाड कोसळल्याने तारांसह विद्युत खांब जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे मध्यरात्री वीज खंडित झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला व समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्राहकांकडून वीज कंपनीच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. कॅम्प रस्त्यावर वनविभाग कार्यालयासमोरील अतिभारित वीजतारांवर झाड कोसळल्याने रात्रीच वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेमुळे संगमेश्वर फीडरवरील वीजजोडण्या प्रभावित झाल्या. कॅम्प रस्ता, संगमेश्वर, साठफुटी रोड, १२ बंगला, बाजार समिती व्यापारी संकुलासह कॅम्पमधील काही परिसरात अंधार होता. नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. लघु उद्योग कोलमडून पडले होते. वीज कंपनीविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. मालेगावात मान्सूनचे वेळेवर आगमन झाले आहे. शहरात वीज कंपनी व महानगरपालिकेतर्फे वीज पुरवठ्याबाबत मान्सूनपूर्व देखभाल झाली नाही. अनेक ठिकाणच्या तारा जीर्ण झाल्या आहेत, तर जादा जोडणीच्या भारामुळे झुकेलेले विद्युत खांब आहे त्या स्थितीत आहेत. काही ठिकाणी तारा जमिनीपर्यंत झुकल्या आहेत. यावर अद्याप दुरुस्ती अथवा देखभाल झालेली नाही. तारांमध्ये अडकलेले लहान मोठ्या झाडेझुडपांची छाटणी केली गेली नाही, त्यामुळे पावसाचे वातावरण तयार झाल्यावर पाऊस व सोसाट्याच्या वारा आल्यास तारांमध्ये घर्षण होते व तांत्रिक बिघाड निर्माण होऊन वीजपुरवठा त्वरित बंद पडतो. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत; परंतु वीज कंपनीचे या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.