नाशिक- जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत वेतन अडकल्याने त्रस्त झालेल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षकांनी आज दुपारी गडकरी चौकात अचानक रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे वीस मिनिटे केलेल्या या आंदोलनामुळे वाहतुक ठप्प झाली होती. वेतन मिळत नसल्याने आज संस्थेच्या सुमारे चारशे ते पाचशे कर्मचाऱ्यांनी गडकरी चौकात सहकार निबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर दुपारी अचानक रास्ता रोको केल्याने वाहतुक ठप्प झाली होती. पोलीसांनी हस्तक्षेप करुन आंदोलकांना परावृत्त केले. दरम्यान जिल्हा बॅँकेमार्फत लवकरच प्रलंबित वेतन अदा केले जाईल असे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात ैआले.
वेतन अडकल्याने नाशिक एज्युकेशनच्या शिक्षकांचे आंदोलन
By admin | Updated: April 27, 2017 16:55 IST