शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट

By admin | Updated: January 14, 2017 00:39 IST

आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट

नाशिक : आधी पदवीधर निवडणुकीची आणि आता जिल्हा परिषद व महापालिकांची आचारसंहिता जाहीर झाल्याने मिनी मंत्रालयाकडे पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींच नव्हे तर अधिकारीही निवडणुकीच्या कामात अडकल्याचे चित्र असल्याने जिल्हा परिषदेत सध्या शुकशुकाट जाणवत आहे.आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्यात आली आहेत. त्यात अध्यक्ष विजयश्री चुंभळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव, महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे, शिक्षण व आरोग्य सभापती किरण थोरे आदि सहा पदाधिकाऱ्यांची वाहने जिल्हा परिषद प्रशासनाने जमा केली आहेत. तसेच या जिल्हा परिषद मुख्यालय व सरकारी निवासस्थानी या पदाधिकाऱ्यांना पुरविण्यात येणारी दूरध्वनी सेवाही खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पदाधिकारी फिरकेनासे झाले आहेत. त्यातच काही पदाधिकाऱ्यांचे गट आरक्षणात उडाल्याने त्यांना आरक्षित संवर्गातून त्यांच्या गटातून पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी असल्याने त्यांची धावपळ सुरू आहे.ज्या सदस्यांचे गट आरक्षणातून वाचले आहेत, त्यांनी पुन्हा मिनी मंत्रालयात येण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाल्याने जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीची कामे लागल्याने त्यांचीही जिल्हा परिषदेत हजेरी कमी झाली आहे. साहजिकच लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची हजेरी जिल्हा परिषदेत कमी झाल्याने मुख्यालयात शुकशुकाट जाणवत आहे. (प्रतिनिधी)