शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या बंदमुळे बाजारभावात घट

By admin | Updated: July 10, 2016 01:07 IST

आडत प्रकरण : शेतकऱ्यांची कोंडी

पंचवटी : शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत आता व्यापाऱ्यांकडून वसूल करावी, असे आदेश शासनाने बाजार समित्यांना दिल्याने शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शनिवारपासून लिलावात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याने बाजार समितीतील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. व्यापाऱ्यांच्या बंदमुळे अवघा दहा टक्केमाल दाखल झाला आणि भावही मोठ्या प्रमाणात कोसळले.शनिवार सकाळी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल किरकोळ व्यापारी व चवळी दलालांनी खरेदी केला, मात्र बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाने शेतकरी हिताचा निर्णय म्हणून शेतकऱ्यांऐवजी यापुढे शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आडत वसूल करावी, असे स्पष्ट केल्याने व्यापारीवर्गाने एकजूट करत शासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी लिलावात सहभागी न होण्याचे ठरवून बेमुदत बंदची हाक दिली आहे. शनिवारी सकाळी शेतकऱ्यांनी शेतमाल आणला खरा, मात्र शुक्र वारी मिळालेल्या बाजारभावापेक्षा निम्म्या दराने किरकोळ व्यापारी व भरेकऱ्यांनी (चवळी दलाल) शेतमाल खरेदी केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. बाजार समितीत ढोबळी मिरची, काकडी, हिरवी मिरची, वांगे, कोबी, फ्लॉवर अशा फळभाज्या विक्र ीसाठी आल्या होत्या, मात्र फळभाज्यांची केवळ १० ते १५ टक्के आवक आलेली होती. आडत प्रकरणामुळे व्यापारीवर्गाने शेतमाल खरेदी न केल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. एरवी शेतमालाने भरगच्च होणारी बाजार समिती शनिवारी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे ओस पडलेली होती. (वार्ताहर)