शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलामुळे द्राक्ष मण्यांना तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 13:12 IST

लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील द्राक्ष उत्पादक असलेल्या रकीबे परिवाराच्या सुमारे पंचेचाळीस एकर क्षेत्रात असलेली द्राक्ष बागेतील तयार होत असलेली द्राक्षे झाडावरच सडून गेली असून बागेतच उग्र वास येत आहे.

लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील द्राक्ष उत्पादक असलेल्या रकीबे परिवाराच्या सुमारे पंचेचाळीस एकर क्षेत्रात असलेली द्राक्ष बागेतील तयार होत असलेली द्राक्षे झाडावरच सडून गेली असून बागेतच उग्र वास येत आहे. सततचा पाऊस व हवामानात अचानक होणारा बदल यामुळे द्राक्ष पिकावर विपरीत परिणाम होत आहे. द्राक्ष मण्यांना तडे जात असून द्राक्ष मणी सडून गेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च करून हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिसकावून घेतला आहे.साधारण एक महिन्यात बाजारपेठ व निर्यातीसाठी तयार होत असलेल्या द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणावर सुमारे ८० टक्के नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागेवर करपा व डावण्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.फ्लॉवरीग स्टेजला कुज येणे, पोंगाअवस्थेत घड जिरून जाणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान घडत आहे. यासाठी शासनाने द्राक्ष उत्पादकांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे अशी मागणी ठेंगोडा येथील द्राक्ष उत्पादक रकीबे परिवाराकडून करण्यात येत आहे. ठेंगोडा येथील सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रातील असलेल्या द्राक्ष बागेचे सततच्या पावसामुळे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी सहाययक पुष्पा गायकवाड यांनी तयार करून वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे सांगितले.या संदर्भात महसूल विभागाने संबंधित नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा हात द्यावा अशी मागणी संबंधितांकडून करण्यात येत आहे.  गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजाने पुढील कांदा पीक घेण्यासाठी लागणारे कांदा उळे या पावसामुळे बहुतांशी ठिकाणी वाया गेले असून शेतकऱ्यांना पुन्हा उळे टाकण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक