शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलामुळे द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 01:16 IST

नाशिक : द्राक्षपंढरी आणि वाइन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्णातील द्राक्षबागांवर हवामान बदलामुळे विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात कडाक्याच्या थंडीनंतर गेल्या दोन-तीन दिवसांतील ढगाळ वातावरण आणि त्यानंतर अचानक तापमान घसरून ५.७ अंशांपर्यंत घसरल्याने द्राक्षमणी फुटण्याचा धोका वाढला असून, सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे द्राक्षबागांवर भुरी, करपा, डावनी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत.

ठळक मुद्देरोगांचा प्रादुर्भाव : मणी फुटण्याचा धोका वाढल्याने बागा वाचविण्याचे आव्हान

नाशिक : द्राक्षपंढरी आणि वाइन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्णातील द्राक्षबागांवर हवामान बदलामुळे विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात कडाक्याच्या थंडीनंतर गेल्या दोन-तीन दिवसांतील ढगाळ वातावरण आणि त्यानंतर अचानक तापमान घसरून ५.७ अंशांपर्यंत घसरल्याने द्राक्षमणी फुटण्याचा धोका वाढला असून, सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे द्राक्षबागांवर भुरी, करपा, डावनी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत.संपूर्ण हंगामात विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागा गेल्या महिन्यातील कडाक्याच्या थंडीमुळे साखरभरणी काही प्रमाणात लांबली असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांत तापमानाचा पारा वधारत असताना गुरुवारी (दि.२९) नीचांकी ५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.तापमानाचा पारा घसरल्याने द्राक्षमणी तडकण्याचा धोका वाढला असून, अपेक्षित साखरभरणी होण्याचा कालावधीही लांबला आहे. या परिस्थितीत वाढीला लागलेल्या द्राक्षबागांमधील मणी वाचविण्यासाठी शेतकºयांकडून बागांमध्ये शेकोटी पेटवून ऊब निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. तसेच हवामान बदलामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या या रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत कृषी तज्ज्ञांकडून द्राक्षबागांच्या अंतिम टप्प्यात योग्य औषध व औषधाचे प्रमाण याविषयी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच फवारणी करताना कमी कार्यक्षमतेपासून मध्यम कार्यक्षमतेची फवारणी यंत्रे वापरण्यासोबतच फवारणीमुळे द्राक्षमण्यांवर फवारणीचे द्रावण ओघळून येणार नाही अथवा फवारणीवेळी सल्फरचे डाग पडणार नाही याची दक्षता घ्यावी, सल्फर वापरलेल्या बागेमध्ये जैविक नियंत्रण घटकांचा वापर शक्य तेव्हा करावा, असा सल्लाही कृषितज्ज्ञाकडून दिला जात आहे. त्यामुळे द्राक्षबागा संकटात असताना शेतकरी मात्र समस्येवर मार्ग काढण्याच्या विचारांनी चिंताक्रांत झाला आहे. द्राक्षबागांना हवामान बदलामुळे धोका संभवत असला तरी शेतकºयांनी अतिघातक औषधांचा अधिक वापर न करता तज्ज्ञांच्या सल्ल्याने बागांची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. तापमानाचा पारा घसरला असला तरी सर्व क्षेत्रात तापमान सारखेच असते, असे नाही. त्यामुळे विहीर आणि खोलगट भागालगत अगदी नीचांकी सहा ते पाच अंशांपर्यंत तापमान असलेल्या भागातच शेतकºयांनी शेकोटी पेटवून बागांना ऊब देणे आवश्यक आहे.- डॉ. एस. डी. सावंत,द्राक्ष उत्पादन मार्गदर्शक, पुणे