शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

नवरात्रोत्सवातही डीजेवर बंदी

By admin | Updated: September 29, 2016 00:39 IST

आयुक्तांचे आदेश : डीजे लावल्यास होणार कारवाई

नाशिक : नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून शहरात मंडळांच्या तयारीलाही वेग आला आहे़ नवरात्रोत्सवात गणेशोत्सवाप्रमाणे डीजेवर बंदी कायम राहणार असल्याचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी स्पष्ट केले आहे़ त्यामुळे डीजेचा वापर करणारे तसेच ध्वनीची मर्यादा ओलांडणाऱ्या देवी मंडळांना पोलिसांच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे़ गणेशोत्सवाप्रमाणेच शहरात नवरात्रोत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो़ या उत्सवासाठी मंडळांनी जोरदार तयारी सुरू केली आहे़ तर पोलीस प्रशासनाकडून पोलीस ठाणेनिहाय बैठका घेऊन या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात असून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे़ या सूचनांचे पालन न करणाऱ्या मंडळांना परवानगी नाकारली जाणार आहे़न्यायालयाने गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी ध्वनिमर्यादा घालून दिल्या आहेत़ या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पोलीस तसेच महापालिका अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार गणेशोत्सवात मंडळांवर अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या मंडळांनाच परवानगी देण्यात आली होती़ त्यानुसार नवरात्रोत्सवातही या अटी व शर्ती कायम असणार आहेत. गणेशोत्सवात डीजे लावून ध्वनिमर्यादा न पाळणाऱ्या ३४ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते़ या गुन्ह्यासाठी पाच लाख रुपयांचा दंड व कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे़ त्यामुळे देवी मंडळांनी ध्वनिमर्यादा व पोलिसांच्या सूचनांचे पालन करून कारवाई टाळावी, असे आवाहन पोलिसांतर्फे केले जाते आहे़ (प्रतिनिधी)