शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवातही डीजेवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:19 IST

: गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रातही डीजेचा वापर करण्यास पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने लागू केलेल्या नियमांप्रमाणे या विषयीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवरात्रोत्सवासारखा सण साजरा करताना दांडिया, गरबा खेळताना साउंड सिस्टीमचा आवाज किती असावा, यासंदर्भात काही निकष घालून दिले आहेत.

नाशिक : गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रातही डीजेचा वापर करण्यास पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने लागू केलेल्या नियमांप्रमाणे या विषयीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवरात्रोत्सवासारखा सण साजरा करताना दांडिया, गरबा खेळताना साउंड सिस्टीमचा आवाज किती असावा, यासंदर्भात काही निकष घालून दिले आहेत. यामध्ये वापरल्या जाणाºया डीजेच्या वापराला हरकत घेण्यात आली आहे. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.  गणेशोत्सव आणि अनंत चतुर्थीला सक्तीने केलेली डीजेवर बंदी नवरात्रोत्सवातही  कायम असणार आहे. नवरात्रोत्सवात कोणत्याही मंडळ व मंदिर परिसरात डीजेला परवानगी देण्यात आलेली नसून इतर साउंड सिस्टीम वापरताना आवाजाची मर्यादा पाळण्याचीही सक्ती करण्यात आली आहे. यानुसार रहिवासी भागात ५५ ते ४५ डेसिबल इतके आवाजाच्या मर्यादेचे बंधन असून, शांतता क्षेत्रात ५० ते ४० डेसिबल आवाजाची मर्यादा लागू करण्यात आली आहे. यामुळे दांडियाप्रेमी, मंडळाचे कार्यकर्ते यांनी नाराजी व्यक्त केली असून, डीजेवाल्यांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.मंडळाचे पदाधिकारी संभ्रमातनवरात्रोत्सव काळात डीजेसह साउंड सिस्टीम बुक करावी की नाही, या संभ्रमात मंडळाचे पदाधिकारी अडकले आहेत. त्यांनी पोलीस प्रशासनाकडे आवाजाची मर्यादा पाळणार असून, डीजेला परवानगी द्यावी, अशा मागणीचे अर्ज केले असून, ते उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे परवानगी मिळते की नाही या अनिश्चिततेमुळे मंडळांनी साउंड सिस्टीमचे बुकिंगच केलेली नाही. त्यामुळे साउंड व्यावसायिकही धास्तावले आहेत.