शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख रस्त्यांसह मुख्य बाजारपेठांमध्येही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहरात झपाट्याने वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या आणि शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे पोलिसी दंडुक्याच्या भीतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : शहरात झपाट्याने वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या आणि शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे पोलिसी दंडुक्याच्या भीतीने सलग पाचव्या वीकेंड बंदलाही नाशिककरांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील विविध रस्त्यांसह मुख्य बाजारपेठांमध्येही अपवाद वगळता शनिवारी (दि. ९) शुकशुकाट दिसून आला.

कोरोनामुळे सलग पाचव्या शनिवारीही नाशिककर घरातच थांबले. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह, उपनगरे आणि रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. गत आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार वीकेंडला वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. शहरात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना आवश्यक बेड, ऑक्सिजन व रेमडेसिवीर यासारखी औषधे उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी कोरोनाचा धसका घेत घराबाहेर पडणे टाळले. शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना शासनाने लागू केलेले कडक निर्बंध लागू केले असून, या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी पोलीसही रस्त्यावर असल्याने पोलिसी दंडुक्याची भीती आणि तापमानाचा चाळिशीपर्यंत वाढलेला पारा यामुळे नाशिककरांनी घरातच बसणे पसंत केले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवार ते शुक्रवार दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीसह विविध कडक निर्बंध घालण्यात आले आहे, तर आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवारी या निर्बंधांची पोलिसांकडून आणखी काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने बंद होती. दरम्यान, काही नागरिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून बाहेर पडताना दिसले. मात्र, यात वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक होते. काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात भाजीपाला आणि फळ विक्रेते रस्त्यावर असले तरी त्यांना तासनतास ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली.

मुख्य रस्ते, बाजारपेठेत शुकशुकाट

नेहमीच ग्राहकांची वर्दळ असलेल्या शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठेतील रविवार कारंजा, मेनरोड, शालीमार परिसरात शनिवारी शुकशुकाट होता. गेल्या आठवड्यात जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर या भागातील गर्दीवर नियंत्रण आले असून, शनिवारी सर्वत्र शांतता दिसत होती.