शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात आज पाच ठिकाणी ड्राय रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:52 IST

कोरोनावर मात करण्यासाठी लवकरच देशपातळीवर लसीकरण करण्यात येणार असल्याने त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शुक्रवारी (दि. ८) जिल्ह्यातील पाच ठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देग्रामीणसह शहराचा समावेश : यंत्रणा सज्ज

नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी लवकरच देशपातळीवर लसीकरण करण्यात येणार असल्याने त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शुक्रवारी (दि. ८) जिल्ह्यातील पाच ठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार आहे. या वेळी लाभार्थ्यांना प्रत्यक्षात लस देण्यात येणार नसली तरी, त्यानिमित्ताने आरोग्य व्यवस्थेच्या तयारीची रंगीत तालीम करून घेण्यात येणार आहे. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय, त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय, नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री ग्रामीण रुग्णालय, नाशिक महापालिकेचे नवीन बिटको रुग्णालय व मालेगाव येथील मदनेनगर येथील शहरी आरोग्य केंद्रात सकाळी आठ वाजेपासून या ड्राय रनला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिली. या रंगीत तालमीसाठी नियुक्त केलेल्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना सकाळी आठ वाजताच केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ड्राय रनसाठी प्रत्येक केंद्रावर लाभार्थी म्हणून प्रत्येकी २५ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्यक्ष ड्राय रन सकाळी १० वाजता सुरू करण्यात येणार आहे. गुरुवारी यासंदर्भातील तयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात तयारीचा आढावा व पूर्ततेवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाल्यास पहिल्या टप्प्यात १८,१३५ शासकीय आरोग्य कर्मचारी व १२,४८० खासगी संस्थांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली असून, लसीकरणासाठी १,०२९ लसटोचकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात लस साठविण्यासाठी २१० आइस लाइन रेफ्रिजरेटर उपलब्ध  आहे, अशी माहिती देण्यात आली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शल्य चिकित्सक रत्ना रावखंडे, डॉ. रवींद्र चौधरी, डाॅ. बापू नागरगोजे आदी उपस्थित होते. अशी असेल व्यवस्थाn प्रत्येक केंद्रात ड्राय रनसाठी तीन रूम असतील. पहिल्या रूमला वेटिंग रूम म्हणून संबोधण्यात येईल. तेथे टोकननुसार लाभार्थ्यांना ६ फुटांच्या अंतरावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून बसविण्यात येईल. याच रूममध्ये प्रारंभी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तापमान घेऊन सॅनिटाईझ करण्यात येईल व मास्क वापरणे बंधनकारक असेल. n दुसरी रूम व्हॅक्सिनेशन रूम असेल. याच रूममध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची ओळखपत्रानुसार ओळख निश्चित करण्यात आल्यावर त्याची ‘को-विन ॲप’मध्ये नोंद करण्यात येईल. लाभार्थ्यांना लसीकरणाविषयी संपूर्ण कल्पना दिली जाईल.n तिसरी रूम ऑब्झर्वेशन रूम असेल. लाभार्थ्यांना लसीकरणानंतर किमान ३० मिनिटे बसविण्यात येईल. लसीकरणानंतर उद‌्भवणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीचे या ठिकाणी अवलोकन करण्यात येईल.

टॅग्स :NashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लस