शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

आर्द्राही कोरडे; पुनर्वसू पडणार?

By admin | Updated: June 30, 2014 00:52 IST

आर्द्राही कोरडे; पुनर्वसू पडणार?

नाशिक : मृगापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रही कोरडे जात असल्याने नाशिककरांच्या चेहऱ्यावर आता चिंतेचे ढग दाटू लागले आहेत. शहरवासीयांची पावसाची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणाऱ्या पुनर्वसू नक्षत्रात समाधानकारक पावसाची शक्यता ज्योतिषतज्ज्ञांनी वर्तवली आहे, तर हवामान खात्यानेही याच काळात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवल्याने नागरिकांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. यंदा ८ जून रोजी मृग नक्षत्राला प्रारंभ झाला खरा; मात्र या नक्षत्राने नागरिकांच्या अपेक्षांवर पाणीच फेरले. या काळात पावसाचा थेंबही न पडल्याने सर्वांनाच आर्द्राचे वेध लागले. भीजपावसासाठी प्रसिद्ध असलेले हे नक्षत्र २२ जून रोजी लागले; मात्र त्यानेही निराशाच केली. या नक्षत्रातही पावसाने पाठ फिरवली. आता येत्या ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्राला प्रारंभ होत आहे. सिंह लग्न असलेल्या या नक्षत्राचे वाहन गाढव आहे. रविच्या संक्रमणाचा काळ असलेल्या या नक्षत्रात अपेक्षित पर्जन्यवृष्टी होईल, असा ज्योतिषतज्ज्ञांचा होरा आहे. साधारणत: १२ ते १५ जुलैदरम्यान चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २० जुलै रोजी लागणाऱ्या पुष्य नक्षत्रातही समाधानकारक पावसाचे भाकीत पंचांगकर्त्यांनी वर्तवले असल्याचे अभ्यासक रत्नाकर संत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)