शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

ढोल - ताशांच्या गजरात गणरायाला निरोप

By admin | Updated: September 16, 2016 22:18 IST

येवला, लासलगाव : मिरवणुकीत मैदानी खेळांचे प्रात्यक्षिके; महिलाचा उत्स्फू र्त सहभाग; युवकांचा अमाप उत्साह

 

 

येवला: ढोल ,ब्यांजो ,संबळ ,या वाद्याच्या तालासुरात अनंतचतुर्दशीला विविध कसरतीचे प्रयोग दाखवत येवल्यातील विविध गणेश मंडळानीपुढील किमान वर्ष भराच्या कालावधी साठी अधिक उत्साह मिळेल या श्रद्धेने गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.वरु णराजाने अनेक वर्षानंतर यंदा विसर्जन मिरवणुकीत जोरदार हजेरी लावली आण िगणेशभक्तांचा उत्साह द्विगुणीत केला.झांज,काठी लाठी,आगगोळ्याचे प्रयोगासह जुनी आखाडी मच्छ कच्छ गणपती-शारदा नृत्याने उपस्थितांची मने जिंकली .मुख्य मिरवणुकीत १७ गणेश मंडळे सहभागी झाली होती.भाविकांसह पोलिस प्रशासनाने देखील उत्सवाला गालबोट लागू म्हणून जय्यत तयारीने पुरेपूर खबरदारी घेतली. गंगादरवाजा भागातील गणेश विसर्जनकुंडात,तर अनेकांनी अिहल्याबाई होळकर घाटावर श्रीगणेश विसर्जन केले. गुरु वारी अनंत चतुर्दशीला सायंकाळी साडेसहा वाजता गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला आझाद चौकातून सुरु वात झाली.प्रारंभी पहिला मनाचा धोंडीराम वस्ताद तालीम संघाचा गणपती आझाद चौकात साडेसहा वाजता आला.तालमीचे दिवंगत वस्ताद भाऊलाल पहिलवान लोणारी,आणि माजी नगराध्यक्ष स्वर्गीय प्रभाकर कासार यांच्या प्रतिमेला उपमहाराष्ट्र केसरी पहिलवान राजेंद्र लोणारी,माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी,माजी नगराध्यक्ष रामदास पहिलवान दराडे,यांनी श्रद्धांजली अर्पण केली व पुष्पहार घातला .कार्यकर्त्यांनी गणपतीपुढे प्रात्याक्षिके दाखवली .झांज,काठी लाठ्यांच्या मैदानी खेळांचे प्रदर्शन युवकांनी दाखवले.त्या पाठोपाठ रोहिदास गणेश मंडळ ,मोदकेश्वर गणेश मंडळ ,काटामारु ती तालीम संघ,बुन्देल्पुरा तालीम संघ ,बिच्छू गणेश मंडळ,नामदेव व्यायाम शाळा ,खंडू वस्ताद तालीम संघ ,जाईचा मारु ती तालीम संघ,पाटील फ्रेन्ड सर्कल ,शितालामाता दक्षिणमुखी हनुमान मंडळ, जय बजरंग गणेश मंडळ गंगादरवाजा,जय महाराष्ट्र मित्र मंडळ,सह्याद्री ग्रुप मधली गल्ली ,कालाविहार गणेश मंडळ ,क्र ांती ग्रुप हुडको ,छत्रपती फौंडेशन,क्र ांती गणेश मंडळ,या गणेश मंडळे विविध प्रात्याक्षिके दाखवत मिरवणुकीत सहभागी झाली.तब्बल 7 तास गणेश विसर्जन मिरवणूक चालली.आझाद चौकत येवला नगरपरिषद ,राष्ट्रवादी कॉंग्रेस व हिंदू मुस्लीम पंच कमिटी ,सह्याद्री ग्रुप मधली गल्ली , गंगादरवाजा मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येक मंडळाचे अध्यक्षांचे सत्कार करण्यात आले.सह्याद्री ग्रुपच्या वतीने अंधमुलांचा संगीतमय कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.अखेरीस साडे अकरा वाजता शेवटचा मनाचा परदेशपुरा तालीम संघाचा गणपती वाजतगाजत आझाद चौकात आला.व अनंत चतुर्दशीला रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास श्री गणेश विसर्जनाने सांगता झाली. आझाद चौकात नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे,प्रांताधिकारी वासंती माळी,मुख्याधिकारी राहुल वाघ ,तहसीलदार नरेश बिहरम,पोलीस निरीक्षक सुनील पाटील, जिल्हा बँक चेअरमन नरेंद्र दराडे ,,बाळासाहेब लोखंडे,नानासाहेब लोंढे,सोमनाथ लोंढे,डॉ भूषण शिनकर,रामदास पिहलवान दराडे,अविनाश कुक्कर ,नगरसेवक संजय कसार,विश्वास निंबाळकर,संदीप पाटील,प्रवीण पिहलवान,काझी राफिउिद्दन शेख, रवी पवार ,सुनील भावसार ,संजय विधाते,संतोष गायकवाड,राहुल भावसार,यांचे उपस्थितीत मिरवणुकीत सहभागी मंडळाच्या अध्यक्षाचा सत्कार करण्यात आला. अखेरीस शेवटचा मनाचा परदेशपुरा तालीम संघाचा गणपती आझाद चौकात आला.यंदा पोलिसांच्या सुयोग्य नियोजनामुळे कार्यकर्त्यांना आपली प्रात्यिक्षके चांगली दाखवता आली.यामुळे पोलिसांच्या नियोजनाला विविध मंडळांनी सलाम केला. लासलगाव गणेश विसर्जन मिरवणूकलासलगाव ..लासलगाव येथील जागितक कांदा बाजारपेठेबाजारपेठेत कमी झालेला कांदा भाव आणी शेतकरी वर्गाच्या चिंतेचा स्थान देत लासलगाव येथील क्र ांती मित्र मंडळाच्या वतीने कांदा गणपती हा चर्चेचा विषय ठरला.फटाके आण िगुलालाची उधळण न करता फुलांची उधळण करीत ढोल-ताशांच्या व डी जे च्या गजरात लासलगाव मधील श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळपासून प्रारंभ झाला. यंदा गणेश विसर्जनाबरोबर सकाळी व दुपारच्या सत्रात पावसाचे आगमन झाले.गुरूवारी बापाच्या ७५१ घरगुती लहान मूर्ती बी एस एन एल कार्यालयाजवळ क्र ांती मित्र मंडळ व पोलीस ठाणे मार्फत जमा करून त्या चास नळी येथे गोदामाईच्या वाहत्या पाण्यात विसिर्जत करण्यात आल्या.लासलगांव येथील कनिष्ठ महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय सेवा योजना अतर्गत निर्माल्य संकलन रॅली काढण्यात आली. तिला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक समवेत कनिष्ठ महाविदयालयाचे पर्यवेक्षक के.एम. दायमा ,अनिल शेजवळ, एन.एस.एस कार्यक्र म अधिकारी बागल, किशोर गोसावी, जाधव ,उज्वल शेलार उपस्थीत होते..गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषात लाडक्या बप्पाला निरोप देण्यात आला.या प्रसंगी विसर्जन मिरवणुकीत गुलाल चा वापर ना करता सर्व मंडळाने गुलाब व झेंडू च्या फुलांच्या पाक ळ्या उधळण करून गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे घोषणेने लासलगाव परीसात भक्तीमय वातावरणात झाले होते. फुलांची उधळण करीत ढोल-ताशांच्या व डी जे च्या गजरात लासलगाव मधील श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आला होते . रात्रीपर्यत मिरवणुका सुरू होत्या. क्र ांती मित्र मंडळ यांनी सकाळी जल्लोषात मिरवणूक काढून बाप्पांचे विसर्जन केले यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला त्यानंतर मंडल तर्फे भंडारा आयोजित केलेला होता.संत नामदेव युवक मित्र मंडळ यांनी देखील दुपारी गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात केले या मंडळात देखील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती त्याच प्रमाणे गोल्डन मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ,शिवरत्न मित्र मंडळ यांनी देखील ढोल ताशे व डी जे च्या गजरात भर पावसात विसर्जन केले व लासलगाव करांचे लक्ष वेधून घेतले होते. गणेश विसर्जन मिरवणुकीतली ही जुनी परंपरा यंदाही टिकून होतीमिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी सकाळपासून फिरताना दिसले. लासलगाव चे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.लासलगाव व परिसरातील लहान मोठ्या एकूण ६५ मंडळांकडून श्रींचे विसर्जन शांततेत करण्यात आले.