मालेगाव : येथील पंचायत समितीत मिरची व कांदा पिकांवरील विविध रोगांवर फवारणी करण्यासाठी ५० टक्के अनुदानावर औषधे उपलब्ध झाली असल्याची माहिती पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली. तालुक्यातील मिरची पिकावर पडणाऱ्या चुरडा-मुरडा रोगासाठी कार्बन डॉयझीम ५० टक्के ४१५ किलो, डायमेयोएट ३० टक्के २०० लिटर तर सल्फर ८० टक्के डब्लू पी ५०० किलो तर कांद्यावरील फुलकिडे व करपावर नियंत्रणासाठी मॅन्कोसेब-७५ डब्लू पी ७०० किलो व मॅलेथिआॅन ५० ई सी २०० लिटर उपलब्ध झाले आहेत. शेतकऱ्यांनी मिरचीसाठी २६४ रुपये तर कांद्यासाठी २८७ रुपये हेक्टरी दराप्रमाणे लागवड धारक शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे संपर्क साधाव, असे आवाहन सभापतींनी केले आहे.
मालेगाव येथे अनुदानावर औषधे
By admin | Updated: December 19, 2014 23:43 IST