शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थाची तस्करी : दोघा तिबेटीयनांवर कारवाईपंधरा वर्षे कारावास

By admin | Updated: September 13, 2014 01:05 IST

अमली पदार्थाची तस्करी : दोघा तिबेटीयनांवर कारवाईपंधरा वर्षे कारावास

नाशिक : अमली पदार्थाची वाहतूक व तस्करी करण्याच्या आरोपावरून न्यायालयाने दोघा तिबेटीयांना प्रत्येकी पंधरा वर्षे कारावास व दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. नाशिक न्यायालयात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये शिक्षा होण्याची ही अलीकडची पहिलीच वेळ आहे. त्सेसिंग टॉबजेस ऊर्फ जिलेबीभाई व टॅमडिन सिचोई ऊर्फ छोटूभाई अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. शहरातील तिबेटीयन मार्केट येथे स्वेटर विकण्याच्या बहाण्याने ते अमली पदार्थाची तस्करी करीत असल्याची माहिती मुंबईच्या इंटेलिजन्स विभागाला लागली होती. त्यांनी १३ फेब्रुवारी २०११ रोजी दुपारी अचानक तिबेटीयन मार्केटमध्ये छापा मारून गाळा नंबर ९२ मध्ये झडती घेतली असता ६६ किलो हशीश जप्त करण्यात आले होते.नाशिक पोलीस आयुक्तालयापासून अगदीच हाकेच्या अंतरावर इतक्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाचा साठा करण्यात आल्याची भनक नाशिक पोलिसांना नव्हती. मुंबईच्या पथकाने संपूर्ण साठा ताब्यात घेतल्यानंतर दोघा आरोपींना अटकही करण्यात आली. तेव्हापासून ते मध्यवर्ती कारागृहात आहेत. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ऊर्मिला जोशी-फलके यांच्यासमोर होऊन सरकारतर्फे विशेष सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी सात साक्षीदार तपासले. त्यात दोन्ही आरोपींविरुद्ध सबळ पुरावा सिद्ध झाल्याने न्यायालयाने अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा कलम २० (२) (क) अन्वये प्रत्येकी पंधरा वर्षे सक्तमजुरी व कलम २९ अन्वये पुन्हा पंधरा वर्षे सक्तमजुरी व दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आरोपींनी दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत. (प्रतिनिधी)