शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

औषध टंचाई रुग्णांच्या मुळावर

By admin | Updated: May 30, 2017 00:26 IST

राज्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयातून अशाप्रकारची अत्यावश्यक औषधी मिळणे बंद झाले असून, त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : हिमोफिलिया रुग्णांसाठी जीवनावश्यक असलेली औषधे वेळेत खरेदी न करता टेंडर प्रक्रियेत अडकवण्याचा असंवेदनशील प्रकार राज्यशासनाच्या आरोग्य विभागात घडत असून, त्यामुळे राज्यभरात या रुग्णांच्या औषधांची टंचाई जाणवत आहे. राज्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयातून अशाप्रकारची अत्यावश्यक औषधी मिळणे बंद झाले असून, त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहे. अशाप्रकारची अत्यावश्यक औषधे खरेदी करण्यासाठी रुग्णांना खासगी दुकानांमध्ये हजारो रुपये खर्च करावे लागत असून, त्यामुळे शासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याची संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात हिमोफिलियाचे सुमारे साडेतीनशे रुग्ण असून, ते अ व ब अशा दोन प्रकारांत वर्गीकृत करण्यात आले आहेत. या रुग्णांना विशिष्ट प्रकारच्या रक्तघटकाची (फॅक्टर ८ व ९) कमतरता असते. या युनिटची खासगी बाजारपेठेत एका युनिटची किंमत साडेनऊ ते दहा रुपये असून, असे रुग्णाच्या वजनेच्या तुलनेत विचार करता एक ते दीड हजार युनिटची सामान्यत: आवश्यकता असते. त्याची किंमत सत्तर ते ऐंशी हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे शासनाने रुग्णांसाठी जीवनावश्यक असलेली औषधे मोफत देण्याची सुविधा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिली असून, हिमॅटॉलॉजी विभागात उपलब्ध असतात. परंतु दरवर्षी मार्च महिन्यानंतर ही औषधे मिळणे बंद होतात. शासनाकडून निविदाप्रक्रिया राबविण्यात येत आहे, ती राबविल्यानंतर औषधे उपलब्ध होतील, असे सांगून रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून परत पाठविले जाते. काही प्रमाणात कोटा उपलब्ध झालाच तर कोणत्याही कमी अधिक प्रमाणात ते उपलब्ध करून दिली जातात. परंतु ते पुरेसे नसल्याने खासगी औषधालयांतून हे औषध महागड्या दराने खरेदी करावे लागते आहे.एकीकडे शासन महाशिबिरे भरवत असताना दुसरीकडे मात्र हिमोफिलिया रुग्णांचे मात्र हाल होत असून, शासन जिवावर उठल्याची संतप्त भावना व्यक्त केली जात आहे.