शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात औषधविक्रीचा घोटाळा

By admin | Updated: January 26, 2017 00:37 IST

अन्न-औषध प्रशासन : घाऊक विक्रेत्यांवर परवाने रद्दची कारवाई; पोलिसांत गुन्हा

नाशिक : औषधनिर्मात्या कंपनीकडून हॉस्पिटलसाठी घाऊक विक्रेत्यांमार्फत पाठविण्यात येणारी सवलतीच्या दरातील औषधे बनावट मागणीद्वारे मागवून घेत त्यांची परस्पर रिटेलर्सला विक्री करून औषध घोटाळा व गैरव्यवहार तसेच कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाने नाशिकमध्ये उघडकीस  आणला आहे़ या प्रकरणी गोळे कॉलनीतील दोन घाऊक औषध विक्रेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत़ दरम्यान, एफडीएकडून मनमानी पद्धतीने कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत त्याविरोधात घाऊक विक्रेत्यांनी दुकान बंद आंदोलन सुरू केले आहे़औषध निर्मिती करणारी सिप्ला ही कंपनी हॉस्पिटलसाठी सवलतीच्या दरात घाऊक विक्रेत्यांमार्फत औषधे पाठविते़ यासाठी हॉस्पिटल्सना औषधांच्या करात सूट मिळून रुग्णाचाही फायदा होतो़ नाशिकमधील काही घाऊक विक्रेत्यांनी हॉस्पिटलच्या नावाने बनावट मागणीअर्जाद्वारे कंपनीकडून औषधे मागवून आर्थिक गैरव्यवहार तसेच कंपनीची व सरकारची फसवणूक केल्याची लेखी तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आली होती़ त्यानुसार गत महिनाभरापासून घाऊक औषध विक्रेत्यांची चौकशी सुरू होती़ एफडीएच्या चौकशीत घाऊक विक्रेत्यांनी सिप्ला कंपनीकडे हॉस्पिटलच्या नावाने केलेल्या औषधांच्या आॅर्डरची कागदपत्रे बनावट असल्याचे तसेच औषधांच्या विक्रीच्या नोंदीमध्येही अनियमितता आढळून आली़ घाऊक औषध विक्रेत्यांनी सवलतीच्या दरातील ही औषधे कमिशन घेऊन रिटेलर्सला तर रिटेलर्सने नफा बाजूला काढून घेत रुग्णांना विक्री केली़ संबंधितांनी सिप्ला कंपनीकडे बनावट कागदपत्रांद्वारे आॅर्डर करून कंपनीची व सरकारी कर बूडवून सरकारचीही फसवणूक केली़ तसेच ही औषधे हॉस्पिटलला पुरविण्यातच आली नसल्याचेही चौकशीत समोर आले आहे.सिप्ला कंपनीच्या या औषधांसाठी घाऊक औषध विक्रेत्यांनी हॉस्पिटलच्या नावाने बनावट आॅर्डर व बनावट बिलांची कागदपत्रे कंपनीला पाठविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले़ त्यानुसार गोळे कॉलनीतील दोघा घाऊक औषध विक्रेत्यांविरोधात शनिवारी (दि़ २१) फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचे परवानेही एफडीएने निलंबित केले आहेत़ (प्रतिनिधी)