शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चालकाच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:22 IST

देवळा : मेशी येथील बस दुर्घटना ताजी असतानाच देवळा येथे बसचे चाक अचानक निखळ असतानाच चालकाने प्रसंगावधान दाखवून वेळीच ...

ठळक मुद्देदेवळा : चालत्या बसची निखळली चाके; वाचले प्रवाशांचे प्राण

देवळा : मेशी येथील बस दुर्घटना ताजी असतानाच देवळा येथे बसचे चाक अचानक निखळ असतानाच चालकाने प्रसंगावधान दाखवून वेळीच बस थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह ६५ ते ७० प्रवासी होते. यामुळे बिघाड झालेल्या बसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, परिवहन विभागाने मेशी दुर्घटनेपासून कोणताही बोध घेतल्याचे दिसत नाही.सोमवारी (दि. २४) सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सटाणा आगाराची देवळा कापराई वाखारी ही चक्री बस (एमएच २० डी ९३४१) वाखारी येथून देवळ्याकडे येत होती. देवळा येथील कोलथी नदीवरील पुलावर असलेल्या भाजीमंडईसमोर अचानक बसचे मागील चाक निखळून बाहेर येऊ लागले. चालक व्ही.बी. आहेर यांच्या सदर बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत त्वरित बस रस्त्यालगत उभी केली. अन्यथा चाक पूर्णपणे निखळले असते.परिणामी मोठा अनर्थ घडला असता. परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी बसमध्ये देवळा येथे महाविद्यालयीन व शालेय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह ६५ ते ७० प्रवासी बसमध्ये होते. वाहतूक नियंत्रक व्ही. एन. गोसावी, बसचालक पांडुरंग पवार व प्रवाशांनी चालक आहेर यांचे अभिनंदन केले आहे. ही घटना विंचूर - प्रकाशा या महामार्गावर घडली. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. अपघात झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला, अशी प्रतिक्रिया एका प्रत्यक्षदर्शीने दिली. घटनेनंतर सटाणा आगाराने त्वरित दुसरी बस पाठवून चक्र ी बससेवा पूर्ववत केली.

देवळा ते वाखारी या ६ किमी अंतरावर खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनचालकांच्या मनमानीला व बेजबाबदार वृत्तीला कंटाळून वाखारीच्या ग्रामस्थांनी खासगी प्रवासी वाहतुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामस्थांनी एकत्र येऊन खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद केली. एसटी महामंडळाने याची दखल घेऊन १२ वर्षांपूर्वी वाखारी गावासाठी देवळा ते वाखारी ही चक्र ी बस सुरू केली होती. या नियमित बससेवेमुळे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे. दिवसभरात या बसच्या २२ फेºया होतात.- विलास सिरसाठ, ग्रामस्थ, वाखारी

टॅग्स :Bus Driverबसचालक