शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

देवळा बसस्थानकाला वाहनांचा विळखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 20:15 IST

देवळा : येथील बसस्थानकावर परिवहन महामंडळाने चार महिन्यांपूर्वी सीसीटीव्ही यंत्रणा बसविल्याने रोडरोमिओंसह सोनसाखळी चोरांना आळा बसल्यामुळे प्रवाशी, व विद्यार्थीनींनी समाधान व्यक्त होत आहे. मात्र रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बसस्थानकाला खासगी वाहनांचा विळखा पडत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत परिवहन विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

देवळा बसस्थानकाची रचना चांगल्या पध्दतीने झाली असल्याने संपूर्ण जिल्ह्यात खड्डेमुक्त बसस्थानक अशी पूर्वीपासून ख्याती आहे. विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या देवळा बसस्थानकात दिवसभरात नाशिक, नंदुरबार, साक्र ी, सटाणा, सुरत, पुणे, मुंबई, नगर, धुळे, जळगाव आदी आगाराच्या ४५० बसेसची ये -जा सुरू असते. यामुळे बसस्थानक सतत गजबजलेले असते. बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. तसेच पोलिसांनी देखील कारवाई सुरू केल्यामुळे बसस्थानकावर खिसेकापू व सोनसाखळी चोरांवर आळा बसला आहे. मुलींची छेड काढणाऱ्या तसेच धूम स्टाईलने दुचाकी चालवणाºया रोडरोमिओंनादेखील आळा बसला आहे. रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. आठवडे बाजारासाठी ग्रामीण भागातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने बाजारासाठी देवळा येथे येतात. यापैकी अनेक जण दुचाकीने येतात. शहरात पार्कींगची सुविधा नसल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या दुचाकी बसस्थानकाच्या आवारात उभ्या करतात. यामुळे बसस्थानक दुचाकींनी भरून जाते. त्यातच खासगी वाहने देखील बिनदिक्कतपणे बसस्थानकात ये जा करतात. यामुळे बसस्थानकात बसेसला अडथळे निर्माण होतात. याबाबत परिवहन विभाग दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशी वर्गाकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.इन्फो...स्वच्छ व सुंदर शहर या संकल्पपूर्तीकडे वाटचाल करत असलेल्या देवळा नगरपंचायतीने शहराचे होत असलेले विस्तारीकरण व वाहनांची वाढती संख्या पाहता शहरात पार्कींगसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण शहरातील सुभाष चौक, पाच कंदील, बसस्थानक परिसरात वाहनचालक आपली वाहने बेशिस्तपणे उभी करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. 

 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी